Month: March 2024

विदर्भ

रिसोड बाजार समितीमध्ये कांडी हळदीला मिळाला विक्रमी भाव

वाशिम, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वत्र पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला कमाल १८ हजार २०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून, दरात वाढ होत असल्याने बाजारात हळदीची आवकही वाढत आहे. यंदा दुष्काळी […]Read More

देश विदेश

लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर, ७ टप्प्यात होणार मतदान

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा आज अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदान होणार असून तर 4 जूनला निकाल लागणार आहे. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागणार आहेत. लोकसभेसोबतच आंध्र […]Read More

राजकीय

गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांना 3 वेळा द्यावी लागेल माहिती

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार मतदारांच्या माथी मारले जाणं ही भारतीय लोकशाहीसाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. असे असले तरीही अशा उमेदवारांबाबतची सत्य स्थिती मतदारांना माहित व्हावी यासाठी निवडणूक आयोग काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करतो. एखाद्या उमेदवारांची गुन्हेगारीपार्श्वभूमी असेल तर त्याला 3 वेळा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल. त्या पक्षाला त्याची माहिती […]Read More

ट्रेण्डिंग

या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 13 मे रोजी मतदान होणार आहे. अरुणाचल 20 मार्च अधिसूचना, 19 एप्रिल रोजी मतदान. सिक्कीम 19 मार्चला […]Read More

देश विदेश

इथेनॉल 100 लाँच, देशातील वाहने पूर्णपणे इथेनॉलवर चालू शकणार

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल पारंपारिक गॅसोलीनपेक्षा कमी हरितगृह वायू उत्सर्जित करते.हे इंधन म्हणून जळते तेव्हा ते वाढीदरम्यान पिकांद्वारे शोषलेल्या प्रमाणाएवढे कार्बन डाय ऑक्साईड (CO2) सोडते. अशारितिने पर्यारणाचा समतोल राखण्यात आणि प्रदुषण नियंत्रणात सहाय्यभूत ठरणारे इथेनॉल 100 आज सरकारने लाँच केले आहे. यामुळे आता देशात वाहने पूर्णपणे इथेनॉलवर चालवता येऊ शकतील. सरकारने […]Read More

ट्रेण्डिंग

उसाला ५ हजार रु FRP मिळावा म्हणून SC मध्ये जनहित

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील महत्त्वाचे कृषी उत्पादन असलेल्या उसाला दरवर्षीच हमीभावासाठी झगडावे लागते. इथेनॉल निर्मितीला घातलेला लगाम आणि साखर निर्यातीवरील बंधनांमुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. राज्यातील २०६ पैकी ११४ कारखान्यांनी दोन हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे.शेतकऱ्यांना दर हंगामात FRP साठी लढावे लागते. या पार्श्वभूमीवर उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर […]Read More

साहित्य

नरहर कुरुंदकर स्मारकासाठी १४.७८ कोटी मंजूर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थोर विचारवंत आणि साहित्यिक कै. नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड येथील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारने १४.७८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक पूर्णत्वास यावे, यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य […]Read More

राजकीय

कोविडमध्ये लस बनवणाऱ्या कंपनीकडून मोदींना कोट्यवधीचा हप्ता

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकट चालवतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती […]Read More

राजकीय

इलोक्टोरल बाँड हे मोदींनी चालवलेले सर्वात मोठे वसुली रॅकेट

ठाणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात […]Read More