Month: January 2024

देश विदेश

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, यंदाही महाराष्ट्रच अव्वल….

चेन्नई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राने गतवेळप्रमाणेच यंदाही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद आपल्या नावावर करीत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान घेणाऱ्या महाराष्ट्राला ५७ सुवर्ण, ४८ रौप्य,५३ कांस्य अशी १५८ पदके मिळाली. यजमान तामिळनाडू संघाने ३८ सुवर्ण, २१ रौप्य, ३९ कांस्य अशी ९८ पदके जिंकून दुसरे स्थान घेतले. हरियाणा […]Read More

महानगर

सत्ताधारी आमदारांना ५०० कोटींची खैरात, विरोधकांना फुटकी कवडी नाही !

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे आणि विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही […]Read More

महानगर

पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या १४ प्रवक्त्यांची यादी जाहीर…

मुंबई दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी १४ प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, […]Read More

अर्थ

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात

नवी दिल्ली,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (३१ जानेवारी) अधिवेशन झाले. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण, अंतरिम अर्थसंकल्प सादर करणं आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणि चर्चा अशा गोष्टी या अधिवेशनाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या […]Read More

महिला

नव्या संसद भवनात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे पहिले भाषण, जाणून

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानं सुरु झालं. द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या १० वर्षांतील प्रमुख कामांचा उल्लेख केला. द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या वर्षात भारतानं ऐतिहासिक यश मिळवल्याचं म्हटलं आहे.राष्ट्रपती म्हणाल्या […]Read More

देश विदेश

ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात पूजा करण्यास न्यायालयाकडून परवानगी

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणात मोठ निर्णय समोर आला आहे. ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात आता हिंदू भाविक पूजा करु शकतात. वाराणसीमधील न्यायालयानं याबाबत निर्णय दिला आहे. आजच्या निर्णयामुळं ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्यासाठी जाण्यासाठी […]Read More

देश विदेश

दक्षिणेतील या राज्यात मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी

चेन्नई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्रास उच्च न्यायालयाने काल तामिळनाडू सरकारला मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती एस श्रीमाथी यांनी डी सेंथिलकुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. सेंथिलकुमार पलानी हे हिल टेंपल डिव्होटीज ऑर्गनायजेशनचे निमंत्रक आहेत.याचिकाकर्ते सेंथिलकुमार यांची मागणी होती की […]Read More

देश विदेश

नवीन सरकार आल्यावर आम्ही पूर्ण अर्थसंकल्प सादर करू

नवी दिल्ली,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या (१ फेब्रु) अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडतील. हे पर्व नारीशक्तीच्या साक्षात्काराचं […]Read More

विदर्भ

शिवसेनेच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला प्रारंभ

बुलडाणा, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संघटना बांधणी आणि जनतेची संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या ( उबाठा ) वतीने मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा काढण्यात येत आहे . 30 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळापासून या यात्रेला आज सुरुवात झाली. शिवसेना( उबाठा ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण […]Read More

राजकीय

आध्यात्मिक नगरी नाशिकमधून संतांनी केली निवडणुकीची तयारी

नाशिक, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. याच नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चार महाराज लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. यात महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, महंत सुधीरदास महाराज, स्वामी कंठानंद आणि अनिकेत शास्त्री देशपांडे यांचा समावेश आहे. या चारही महाराजांनी निवडणूक लढवण्याची इच्छा जरी व्यक्त केली असली तरी ते […]Read More