mmcnews mmcnews

महानगर

खड्डे बुजवण्‍यात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून ५० लाख ५३ हजार रूपयांचा

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून वेगाने कामे सुरू ठेवली आहेत. मुंबई महानगरातील मुख्‍य व अंतर्गत रस्‍ते खड्डेविरहीत आणि वाहतूक योग्‍य ठेवण्‍याकामी निष्‍काळजीपणा करणा-या विविध कंत्राटदारांवर महानगरपालिका प्रशासनाने बडगा उचलला आहे. खड्डे बुजविण्‍याकामी दिरंगाई करणा-या, प्रचलित नियमावलीनुसार रस्‍ते […]Read More

करिअर

मुलाखतीस जाण्या आधी हे नक्की लक्षात ठेवा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुलाखतीसाठी सर्व कंपन्याचे प्रश्न हे वेगवेगळे असतात (कंपनी डोमेन नुसार) पण असे बरेच प्रश्न असतात जे हमखास विचारले जातात ते पुढील प्रमाणे – १. तुमच्या बद्दल सांगा? (about yourself) – यात मुलाखत घेणाऱ्याला आत्मविश्वास आणि आपण ज्या भाषेत बोलतो ती किती सहज बोलतो हे अभिप्रेत असते. स्वतःला स्वतःबद्दल अमुक एक […]Read More

महानगर

घन कचरा व्यवस्थापनात पर्यवेक्षकांची ९६ पदे रिक्त

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यात सुमारे ३५ हजार कामगार, कर्मचारी कार्यरत आहेत. हा विभाग अत्यावश्यक सेवेत येतो. कामाचे व कामगारांचे दैनंदिन नियोजनाचे कार्य पर्यवेक्षकीय अधिका-यांकडून केले जाते. मात्र पर्यवेक्षकीय संवर्गाच्या एकूण ४२३ पदांपैकी ९६ पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने २४ वॉर्डातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करताना कार्यरत असलेल्य़ा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पूरस्थिती मुळे सांगलीतील कैदी कोल्हापुरात हलवले

सांगली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संभाव्य पूरस्थिती मुळे, सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या कळंबा जेलला हलवले आहेत.सध्या 80 कैदी पाठवले असून उर्वरित कैदी पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे.सांगलीतील पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. वारणा आणि कोयना नदीतून सततच्या वाढत्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटावर जाऊन पोहोचली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर 2019 च्या […]Read More

देश विदेश

NASA अवकाशात प्रक्षेपित करणार कृत्रिम तारा

न्यूयॉर्क, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील देशांनी आणि अवकाश संशोधन संस्थांनी आजवर अवकाशात अनेक कृत्रिम उपग्रह सोडले आहेत. मात्र अद्याप कोणीही तारा अंतराळात कृत्रिम तारा प्रक्षेपित केला नव्हता. हे आव्हान आता NASA अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था पेलणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता या दशकाच्या अखेरीस एक कृत्रिम तारा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत […]Read More

क्रीडा

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या आधी फ्रान्समधील रेल्वे नेटवर्कवर हल्ला

पॅरिस, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीच्या काहीतास आधी फ्रान्समध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. पॅरिसमधील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आलं आहे. रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टिमवर परिणाम झाला आहे. फ्रान्सची ट्रेन ऑपरेटर कंपनी एसएनसीएफने शुक्रवारी न्यूज एजन्सी AFP […]Read More

करिअर

IBPS बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी भरती

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयबीपीएसने (IBPS) बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. या संदर्भात आयबीपीएसने आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. आता उमेदवार २८ जुलै २०२४ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आषाढी वारी दरम्यान पांडुरंगाच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाखांचं दान

पंढरपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीनिमित्ताने राज्यातून आणि परराज्यांतून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमा झाले होते. हरीनामाच्या घोषात दंग झालेले हे वारकरी विठूरायाला आपापल्या परिस्थितीनुरुप काही ना काही पैसे, द्रव्य अर्पण करत असतात. यानिमित्ताने विठ्ठलाच्या दानपेटीत दरवर्षीच कोट्यवधींचे दान जमा होते. याच मोजदाज करण्यासाठी मंदीर समितीचे कर्मचाऱ्यांना कित्येक तास लागतात. यावर्षी […]Read More

क्रीडा

भारतीय महिला संघाची आशिया कप फायनल मध्ये धडक

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वेगवान गोलंदाज रेणुका सिंहच्या तीन विकेट्स आणि स्मृती मानधनाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गतविजेत्या भारताने बांगलादेशवर १० गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने महिला आशिष चषक २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या भारताचा सामना रविवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्यासंघाशी होणार आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या […]Read More

Lifestyle

हर्णैचा दोलायमान मासे बाजार हे सीफूड प्रेमींसाठी नंदनवन

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण किनाऱ्यावरील मासेमारी करणारे एक विलक्षण गाव हर्णै, पारंपारिक किनारी जीवन आणि स्वयंपाकाच्या खजिन्याची झलक देते. त्याच्या दोलायमान मासळी बाजारासाठी आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी ओळखले जाणारे, हरणाई अभ्यागतांना ताज्या समुद्री खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी, त्याच्या वालुकामय किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आणि किनारी राहण्याच्या लयीत मग्न होण्यासाठी आमंत्रित करते. कसे पोहोचायचे: हरणाई […]Read More