Month: June 2023

महानगर

राज्यभरात आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर

ठाणे दि ३०– कोरोना च्या काळात आरोग्याच्या समस्यांचा सर्वांनी वाईट अनुभव घेतला आहे. परिणामी आरोग्याच्या दुष्टीने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी देण्यावर आमच्या सरकारचा भर आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . शुक्रवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रम येथे शिंदे -फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. टेंभी […]Read More

महानगर

मुंबईच्या रस्त्यांवर यंदा पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्टचा प्रयोग

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगरात पावसाळ्यात रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे जलदगतीने भरता यावे म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. खड्डे भरण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच रिॲक्टीव्ह अस्फाल्ट मटेरिअलचा वापर केला जात आहे. या कामासाठी महानगरपालिका क्षेत्रात विभागनिहाय कामासाठीची जबाबदारी निश्चित करून खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली आहे. या रिअॕक्टिव्ह अस्फाल्टचा […]Read More

कोकण

रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे,चर्मोद्योग क्लस्टर

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटीचा निधी दिला आहे. त्या माध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.Footwear, leather industry cluster at Ratwad in Raigad […]Read More

साहित्य

पंतप्रधान मोदींनी लिहीलेला ग्रंथ आता मराठीत उपलब्ध

मुंबई,दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ संघ प्रचारक कै. लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकील साहेब यांच्या कार्याचे हृदयस्पर्शी वर्णन करणारा ‘सेतुबंध’हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्व. राजाभाऊ नेने यांनी लिहिला आहे. हा मूळ गुजराती ग्रंथ आता मराठीत उपलब्ध होणार आहे. मंगळवार, ४ जुलै २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे […]Read More

क्रीडा

भारतीय कबड्डी संघाने जिंकली आशियाई चॅम्पियन लीग

बुसान, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय कब्बडी संघ जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करत आहे. कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा ४२-३२ असा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारतीय कर्णधार पवन […]Read More

ट्रेण्डिंग

टोमॅटोने पार केली शंभरी

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू झाला की भाजीपाल्याचे भाव चढायला सुरूवात होते. यावर्षी या दरवाढीत टोमॅटोने बाजी मारली आहे, देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात बाजारात टोमॅटोचे दर दुपटीने […]Read More

क्रीडा

हा क्रिकेटपटू करतोय राजकारणात प्रवेश

अमरावती, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर खेळाडू कोणत्या क्षेत्रात कामगिरी करतात याकडे त्यांच्या फॅन्सचे लक्ष असते. बरेचदा खेळाडू क्रिकेटशी निगडीत विषयातच काम करत असतात. पण आयपीएल २०२३ नंतर निवृत्त झालेला भारताचा ऑलराऊंडर खेळाडू अंबाती रायडूने राजकारणात करिअर घडवण्याचे ठरवले आहे. नुकतीच त्याने आपल्या या दुसऱ्या इनिंगची घोषणा केली. अंबाती रायुडूने आंध्र […]Read More

पर्यटन

आता भारतातूनही घेता येईल कैलास पर्वताचे दर्शन

नवी दिल्ली,दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भगवान शंकराचे निवासस्थान म्हणून मान्यता असलेल्या कैलास पर्वताचे दर्शन घेण्यासाठी भारतीय भाविकांना अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. यासाठी चीनची परवानगी घेऊन असलेल्या तिबेटमध्ये प्रवेश करावा लागतो. येथील हवामान तर खडतर आहेच पण कायदेशीर परवानग्या मिळवण्यासाठी देखील कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक भाविकांना कैलासाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागले आहे. […]Read More

पर्यावरण

बिर्ला कॉलेजच्या ज्ञान दिंडीत स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी जागरण.

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आजच्या आषाढी एकादशीनिमित्त सेंच्युरी रेयॉन, बी.के. बिर्ला कॉलेज, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेयॉन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री विठोवा-रुक्मिणीची भक्ती दाखवण्यात आली आणि निसर्ग संवर्धन आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली. बिर्ला कॉलेजपासून सुरू झालेली ज्ञान […]Read More

करिअर

जम्मू विद्यापीठात 180 पदांसाठी भरती

जम्मू, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जम्मू विद्यापीठाने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विद्यापीठात 180 पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइट jammuuniversity.ac.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये प्राध्यापक, सहायक संचालक आणि इतर पदांचा समावेश आहे. Jammu University Recruitment for 180 Posts उमेदवारांनी अर्ज जम्मू विद्यापीठ, […]Read More