mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

IPL मध्ये खेळाडूंची नक्कल करतोय रोबो डॉग

मुंबई, दि. ११ : यंदाच्या IPL सिझनमध्ये मैदानावर सहजपणे वावरणारा रोबो डॉग चंपक विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं IPL 2026 मध्ये आणखी एक विजय मिळवला. त्यांनी ६ विकेट राखून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. त्यामुळे अर्थातच RR फॅन्स सध्या खुश आहेत. यातच एक अजब घटना घडली. रोबो डॉग चक्क राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंची […]Read More

ट्रेण्डिंग

मध्य रेल्वे मार्गावर लवकरच बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल

मुंबई, दि. 11 : देशातील पहिली नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल लवकरच मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी […]Read More

महानगर

महात्मा फुले यांना द्विशताब्दी जयंती वर्षातच ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी विशेष

पुणे प्रतिनिधी : “क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आग्रह धरला जाईल,” अशी ग्वाही खासदार ज्योती वाघमारे यांनी आज येथे दिली. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन […]Read More

ऍग्रो

रानमाळावर सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून फुलवली आमराई..

बुलडाणा दि ११ – कोकणचा हापूस आंबा अशी ओळख असलेल्या या हापूस आंब्याची लागवड रानमळावर करून बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन करून सेंद्रीय पद्धतीने आमराई फुलवली आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने काळाच्या गरजेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रगतिशील शेतकरी सतीश गुप्त यांनी त्यांच्या पाच एकर खडकाळ शेत जमिनीवर आंब्याची लागवड करण्याचं ठरवलं आणि […]Read More

महानगर

​ महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलमध्ये हुकूमशाही

मुंबई प्रतिनिधी, दि. ११ : महाराष्ट्र अक्युपंकचर कॉन्सिलमध्ये बसविण्यात आलेले प्रशासक आणि रजिस्ट्रार हे मोठ्या प्रमाणात कौन्सिल मध्ये बेबंदपणे हुकूमशाही करत आहेत. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलमधील प्रशासकीय अनागोंदी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर पोहोचला आहे.*कौन्सिलची निवडणूक होणे बाकी आहे. ॲक्युपंक्चर कौन्सिलमधील एक असणारे डॉ रुमी बेरामजी याचीच प्रशासक म्हणून नेमण्याचा हास्यास्पद प्रकार महाराष्ट्र […]Read More

खान्देश

सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू….

नाशिक दि ११ : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळे -शहा रस्त्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात जोरदार धडक होऊन पिकप कार पेटली. यात दोन महिला व दोन पुरुष यांचा होरपळून मृत्यू झाला. पंचाळे येथून काहीजण पिकअप गाडीने जागरण गोंधळासाठी गेल्याची समजते रात्री परत येत असताना पंचाळे- शहा रस्त्यावर पंचाळे गावापासून दोन […]Read More

मराठवाडा

मराठवाड्यात भूकंपाचा धक्का, नागरिक भयभीत ….

हिंगोली दि ११ : मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिक काही काळ घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा […]Read More

मनोरंजन

‘अबब विठोबा बोलू लागला ’ प्रसिद्ध बालनाट्य पुन्हा रंगभूमीवर

मुंबई, दि. 10 : एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर धम्माल करायला सज्ज झालं आहे. हे नाटक प्रामुख्याने सुधा करमरकर (बालरंगभूमीच्या जननी) यांच्या तालमीत तयार झालेले असून, बालकलाकारांसाठी एक उत्तम संस्कारक्षम नाटक म्हणून ओळखले जाते. एका छोट्या मुलाचा विठ्ठलाशी असलेला संवाद, प्रेम आणि भाबडेपणा यावर […]Read More

ट्रेण्डिंग

रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच

मुंबई, दि. 10 : रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘फ्लाइंग फ्ली C6’ लॉन्च केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत ₹2.79 लाख आहे. तथापि, कंपनीने ‘बॅटरी एज अ सर्विस’चा पर्याय देखील दिला आहे. या मॉडेल अंतर्गत बाईकची किंमत कमी होऊन ₹1.99 लाख होईल. या इलेक्ट्रिक बाईकची बुकिंग आणि टेस्ट राइड आज 10 एप्रिलपासून सर्वात आधी बंगळुरूमध्ये […]Read More

पर्यटन

कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या

मुंबई, दि. १० : उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावतील. उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गावी आणि पर्यटनाकरिता नागरिक मोठ्या संख्येने जातात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला […]Read More