रिसोड बाजार समितीमध्ये कांडी हळदीला मिळाला विक्रमी भाव

 रिसोड बाजार समितीमध्ये कांडी हळदीला मिळाला विक्रमी भाव

वाशिम, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वत्र पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला कमाल १८ हजार २०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून, दरात वाढ होत असल्याने बाजारात हळदीची आवकही वाढत आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे घटलेली लागवड, कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीच्या भावाला आधार मिळत आहे. दरम्यान वाशीम जिल्ह्यात हळदीच्या भावाने आतापर्यंतचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच हळदीचे भाव पुढील काळातही तेजीतच राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ML/ML/SL

17 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *