या राज्यात सुरू होतोय Royal Enfield चा नवा प्लांट

 या राज्यात सुरू होतोय Royal Enfield चा नवा प्लांट

चेन्नई, दि. 19 : Royal Enfield चा मोटर्स विभाग आता तामिळनाडूबाहेर आपला पहिला मोठा प्लांट सुरू करणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या या 2,500 कोटींच्या गुंतवणुकीमुळे उत्पादन तर वाढेलच, सोबत हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

रॉयल एनफील्ड केवळ भारतापुरते मर्यादित नाही तर आता एक जागतिक ब्रँड बनला आहे. भारताव्यतिरिक्त बांगलादेश, नेपाळ, ब्राझील, थायलंड, अर्जेंटिना आणि कोलंबिया या देशांमध्ये कंपनीची सीकेडी सुविधा आहे. ही कंपनी 80 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि भारतासह 3,200 हून अधिक स्टोअर्स चालवते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या नवीन प्लांटसाठी जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, या प्रकल्पाला अद्याप कंपनीच्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण केला जाईल. आगामी काळात वाढती मागणी पूर्ण करणे आणि आपली उत्पादन क्षमता आणखी बळकट करणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *