‘ द महाराष्ट्र फाईल्स ’- सरकारी व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचा टिझर लाँच
मुंबई, दि. १९ : गेल्या काही वर्षांत काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स, बंगाल फाईल्स असे चित्रपट प्रदर्शित होत असताना आता सरकारी व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. येत्या २९ मे २०२६ पासून हा मोठ्या पडद्यावर दाखल होतोय. विशेष म्हणजे बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी दाखविण्यात आलेला ही भारतातला हा पहिला सिनेमा आहे.ट्रेलरमध्ये न्यायासाठी झुंज देणाऱ्या एका स्त्रीची व्यथा, व्यवस्थेतील दडपशाही, तसंच संघर्षामागचं सत्य प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे.
‘द महाराष्ट्र फाईल्स’ची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली आहे. कलाकारांची नावे जाणून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर अवश्य पहा.
SL/ML/SL