लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर, ७ टप्प्यात होणार मतदान

 लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर, ७ टप्प्यात होणार मतदान

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा आज अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदान होणार असून तर 4 जूनला निकाल लागणार आहे. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागणार आहेत. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील मतदानाचे वेळापत्रक

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

दरम्यान निवडणूकांच्या सुरळीत आणि न्याय्य पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजनाही लागू करण्यात येणार आहेत. याबाबतही आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली त्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे :

  • आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल घेण्यात आली असून स्टार कँपेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
  • कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲप वर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
  • निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत.

SL/ML/SL

16 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *