गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांना 3 वेळा द्यावी लागेल माहिती

 गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांना 3 वेळा द्यावी लागेल माहिती

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार मतदारांच्या माथी मारले जाणं ही भारतीय लोकशाहीसाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. असे असले तरीही अशा उमेदवारांबाबतची सत्य स्थिती मतदारांना माहित व्हावी यासाठी निवडणूक आयोग काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करतो. एखाद्या उमेदवारांची गुन्हेगारीपार्श्वभूमी असेल तर त्याला 3 वेळा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल. त्या पक्षाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे, असे आज निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून ४ जूनला निकाल लागणार आहे. ५ लाख मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीतील आव्हानंही स्पष्ट केली. त्यामुळे गुन्हेगाही, पैसा, चुकीची माहिती, आचारसंहितेचा भंग समावेश आहे. ब्लॅक मनीचा मोठी समस्या आहे. मागच्या ११ विधानसभा निवडणुकांमध्ये ३४०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत याला रोखनं मोठं आव्हान प्रशासन आणि यंत्रणांवर असणार आहे. या ११ राज्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या रोकडीचं प्रमाण पाच वर्षापूर्वीपेक्षा ८०० टक्क्यांनी वाढल्यांच समोर आलं आहे. त्यामुळे बेकायदेशीर पैसे, दारू, ड्रग्ज आणि मोफत वस्तूं वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

SL/ML/SL

16 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *