महात्मा फुले जयंती समितीवर निवड झाल्याबद्दल अविनाश ठाकरे यांचा माळी महासंघातर्फे सत्कार

 महात्मा फुले जयंती समितीवर निवड झाल्याबद्दल अविनाश ठाकरे यांचा माळी महासंघातर्फे सत्कार

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये मा. श्री. अविनाश ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल माळी महासंघ (मुंबई-कोकण विभाग) यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी केदारनाथ विद्या प्रासरिनीस इंग्लिश स्कूल, नेहरु नगर कुर्ला येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रदेश आघाडी अध्यक्ष श्री. प्रकाश माळी, विभागीय अध्यक्ष श्री. दिनेश रामकृष्ण टाकरखेडे, विभागीय सचिव ॲड. माधव खेरडे, विभागीय प्रसिद्धी प्रमुख श्री. नामदेवराव कुबडे, श्री. बोबडे साहेब, श्री. अनिकेत अविनाश ठाकरे, महिला आघाडी अध्यक्ष (रायगड जिल्हा) सौ. रेखाताई कुर्‍हेकर, व्याख्याती कु. मोनिका काळे तसेच सौ. स्वाती दिनेश टाकरखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान श्री. अविनाश ठाकरे यांच्यासोबत सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याचवेळी सौ. रेखाताई कुर्‍हेकर यांचाही श्री. अविनाशजी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता नाश्ता व चहापानाने करण्यात आली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *