Hantavirus चा उद्रेक : WHO कडून हाय अलर्ट

 Hantavirus चा उद्रेक : WHO कडून हाय अलर्ट

मुंबई, दि.८ : संपूर्ण मानवजातीने कोरोना व्हायरस निकराचा लढा दिल्यानंतर आता एक नवीन भयंकर व्हायरस येऊ घातला आहे. Hantavirus या व्हायरस प्रसार झाला असून: WHO कडून हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. अटलांटिक महासागरातील एका क्रूझ जहाजावर (MV Hondius) हंता व्हायरसचा (Hantavirus) प्रादुर्भाव झाल्याचे समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रेड अलर्ट जारी केला आहे. या प्रकरणामुळे १२ देशांमध्ये हा विषाणू पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

होंडियस या क्रूझ जहाजावर हंताव्हायरस संसर्गाची अनेक संभाव्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या जहाजावर असलेले दोन भारतीय नागरिक लक्षणविरहित असून आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली (IHR) च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही भारतीय नागरिक देखरेखेखाली आहेत, तर मंत्रालय जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांशी जवळचा समन्वय साधत आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रम (IDSP), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर आंतरराष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणांच्या समन्वयाने मंत्रालय विकसित होत असलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रसार: हंता व्हायरस प्रामुख्याने उंदीर, घुशी आणि इतर कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या लाळ, मलमूत्र किंवा लघवीद्वारे पसरतो.मानवी प्रसार: हा विषाणू प्रामुख्याने उंदरांच्या संपर्कातून पसरतो, परंतु एंडीज (Andes) प्रकारातील हंता व्हायरस मर्यादित परिस्थितीत माणसाकडून माणसाला पसरू शकतो.

लक्षणे: यात ताप, शरीर दुखी आणि श्वास घेण्यास त्रास होणे (Hantavirus Pulmonary Syndrome – HPS) अशी लक्षणे दिसतात.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *