धारावीत १२ मे ला जनगणना मार्गदर्शन सभावीरशैव कक्कया कल्याण मंडळाचा पुढाकार,रवींद्र शिंदे करणार मार्गदर्शन

 धारावीत १२ मे ला जनगणना मार्गदर्शन सभावीरशैव कक्कया कल्याण मंडळाचा पुढाकार,रवींद्र शिंदे करणार मार्गदर्शन

मुबंई, दि ८
महाराष्ट्र राज्यात१ मे २०२६ पासून सुरू झालेल्या पहिल्या चरणातील जनगणना प्रक्रियेबाबत समाज बांधवांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी वीरशैव कक्कया कल्याण मंडळाने ‘मार्गदर्शन सभे’चे आयोजन केले आहे.
मंगळवार १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल, नवीचाळ,संत कक्कया मार्ग,धारावी येथे ही सभा होणार आहे.मंडळाचे प्रवक्ते श्री.रवींद्र रूपचंद शिंदे जनगणना फॉर्म भरण्याची पद्धत,आवश्यक कागदपत्रे व कक्कया समाजाची अचूक नोंद करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
“जनगणनेत अचूक नोंद झाली तरच शासकीय योजनांचा लाभ मिळेल,” असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महादेव कृष्णा शिंदे व सचिव यशवंत नारायणकर यांनी केले आहे. सर्व समाज बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार अशाच चर्चा सत्रांचे आयोजन उर्वरित जिल्हा पातळीवरही करण्याचा मानस आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *