सेबीने दिलेल्या निर्देशानंतर स्मॉल आणि मिड-कॅप समभाग गडगडले.

 सेबीने दिलेल्या निर्देशानंतर स्मॉल आणि मिड-कॅप समभाग गडगडले.

मुंबई, दि. १७ (जितेश सावंत) : चार आठवड्यांच्या वाढीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीला साप्ताहिक घसरणीचा सामना करावा लागला. दोन्हीही निर्देशांक सुमारे 2% घसरले. जागतिक बाजारातील मंदी आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात करण्यास विलंब होण्याची चिंता, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री,मध्यम सीपीआय डेटा आणि स्थिर औद्योगिक उत्पादन वाढ, बाजारात पैसे गुंतवणाऱ्या काही हवाला व्यापाऱ्यांशी निगडीत कंपन्यांबाबत ईडीने दिलेला इशारा आणि स्मॉल मिडकॅप समभागांमध्ये वाढलेल्या मूल्यांकनावर सेबीने दिलेला इशारा.यामुळे बाजारात जोरदार घसरण झाली.

The Sensex and Nifty, after experiencing four consecutive weeks of gains, faced a weekly decline with both indexes falling around 2%. The decline was likely due to the global market slowdown, along with concerns over a delay in interest rate cuts by the US Federal Reserve, selling by foreign investors, moderate CPI data, and flat industrial production growth. Furthermore, ED’s warning on companies linked to some hawala traders investing in the market and SEBI’s warning on inflated valuations in small midcap stocks led to a sharp fall in the market.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांना फेब्रुवारीच्या मध्यापासून मोठ्या प्रमाणात विक्रीचा सामना करावा लागला, SEBI ने म्युच्युअल फंडांना गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या निर्देशानंतर स्मॉल मिडकॅप शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.

BSE midcap and small-cap stocks saw significant sell-offs since mid-February, with small midcaps hit the hardest after SEBI’s investor protection directive to mutual funds.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने Fed meet, Japan, England policy rates,mutual fund houses Stress test results,FII flow याकडे असेल.

Technical view on nifty

शुक्रवारी निफ्टीने 20023.3 चा बंद भाव दिला. निफ्टी साठी 22018-21962 हे महत्वाचे सपोर्ट(Support) आहेत. हे तोडल्यास निफ्टी 21812-21797-21740.80-21697-21640-21598-21576.05-21547-21517-21500 हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टी साठी 22040.7-22126-22183-22212-22239.80-22278-22297-22343-22389-22440-22462 हेरेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

सेन्सेक्स 617 अंकांनी घसरला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात सपाट झाली.निफ्टीने 22,526.60 चा नवा विक्रमी स्तर गाठला. परंतु जसजसा दिवस पुढे सरकत गेल्यावर बाजारात चौफेर विक्री दिसून आली आणि दोन दिवसांच्या तेजीला खीळ बसली. सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला.स्मॉलकॅप निर्देशांक 2 टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाला.मंगळवारी अमेरिकन चलनवाढीची आकडेवारी जाहीर होण्याआधी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेताना दिसले.Sensex down 617 points

निफ्टीचा सपाट बंद.

मंगळवारी अजून एका अस्थिर अश्या सत्रात भारतीय बाजार संमिश्र बंद झाले. बाजाराची सुरुवात सकारत्मक झाली. सेन्सेक्स 500 अंकांपेक्षा जास्त वाढला. परंतु प्रॉफिट बुकिंगचा फटका बाजाराला बसला,
बाजार खाली आला. त्याचप्रमाणे सेबी प्रमुखांच्या स्मॉल आणि मिड-कॅप समभागांमध्ये वाढलेल्या मूल्यांकनावर चिंता व्यक्त केल्याने त्याचे पडसाद बाजारावर उमटले तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. त्याचप्रमाणें गुंतवणूकदारांचे लक्ष यूएस चलनवाढ डेटाकडे असल्याने गुंतवणूकदारानी नफावसुलीला प्राधान्य दिले. Nifty ends flat

सेन्सेक्स 906 अंकांनी घसरला, निफ्टी 22 हजाराच्या खाली आला, बुधवारी शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली.मध्यम सीपीआय डेटा आणि स्थिर औद्योगिक उत्पादन वाढीमुळे भारतीय बाजार सकारात्मक नोटवर उघडले परंतु चौफेर झालेल्या विक्रीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला. सेन्सेक्स 1150 अंकांनी तर निफ्टी 430 अंकांनी घसरला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवर मोठा परिणाम झाला .

फेब्रुवारी महिन्यातील अमेरिकेतील महागाईत झालेली वाढ. महागाई दरामुळे यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याच्या प्रक्रियेस विलंब करू शकते, अशी गुंतवणूकदारांना वाटलेली भीती त्याचबरोबर शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या काही हवाला व्यापाऱ्यांशी निगडीत कंपन्यांबाबत ईडीने दिलेला इशारा आणि स्मॉल मिडकॅप कॅप समभागांमध्ये वाढलेल्या मूल्यांकनावर सेबीने दिलेला इशारा यामुळेही गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली परिणामी बाजार गडगडला. Sensex plunges 906 pts, Nifty below 22K

बाजार पुन्हा तेजीत

गुरुवारी f&o एक्सपायरीच्या दिवशी भारतीय बाजारात तेजी परतली. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार सावरताना दिसला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सने जोरदार पुनरागमन केले.निफ्टीने इंट्राडे 22,200 चा टप्पा पार केला आणि सेन्सेक्स देखील आरामात 73,000 च्या वर बंद झाला.भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि आयटी समभाग पुन्हा ट्रॅकवर येताना दिसले आले आणि या समभागांच्या वाढीमुळे बाजार तेजीकडे झेपावला. Market back in green

सेन्सेक्स 454 अंकांनी घसरला
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजारात घसरण सुरूच राहिली.जागतिक बाजारातील मंदी आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात करण्यास विलंब होण्याची चिंता,विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे शुक्रवारी बाजारात घसरण झाली, BSE सेन्सेक्स जवळपास 1 टक्क्यांनी घसरला.मिड आणि स्मॉल कॅपबाबत गुंतवणूकदार बाजारात सावधगिरी बाळगताना दिसले.Sensex ends 454 pts lower

( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )

jiteshsawant33@gmail.com

JS/ML/SL

17 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *