आता इंटरनेटशिवायही करता येईल UPI Payment
मुंबई, दि. १४ : NPCIने आता ऑफलाइन UPI पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे वापरकर्त्यांना आता इंटरनेटशिवायही सहज पैशांची देवाण- घेवाण करता येतील. *99# USSD सर्व्हिसच्या माध्यमातून मोबाईल नंबर टाकून आणि UPI Pin नोंदवून सुरक्षितरित्या ट्रांझेक्शन करता येईल. ही सुविधा विशेषतः कमकुवत नेटवर्क किंवा इंटरनेट नसणाऱ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयोगी आहे. यासह डिजिटल पेमेटं अधिक सुलभ होणार आहे.
अशी वापरा इंटरनेटशिवाय UPI पेमेंट सेवा
- ऑफलाइन यूपीआय पेमेंट करण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा:-
- सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनने *USSD कोड *99# डायल करा.
- स्क्रीनवर ‘वेलकम टू *99#’ चा मेसेज दिसेल. येथे ‘ओके’ वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर अनेक ऑप्शन दिसतील. यामधून ‘सेंड मनी’ चा ऑप्शन निवडा.
- यानंतर मोबाईल नंबरचा ऑप्शन निवडा.
- आता ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्याचा नंबर नोंदवा.
- नंबर टाकल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव स्क्रीनवर दिसेल. ते कन्फर्म करा.
- आता पाठवली जाणारी रक्कम नोंदवा आणि आपला यूपीआय पिन टाका. यानंतर तुमचं पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण होईल.
SL/ML/SL