नेस्कोतील ड्रग्स पार्टीला परवानग्या कोणी दिल्या, फडवणीस सरकार कोणाला पाठीशी घालत आहे: सुरेशचंद्र राजहंस
मुंबई, दि १४
नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणाने मुंबईच्या नावलौकिकाला काळीमा फासला असून त्याला भाजपा महायुती सरकारच जबाबदार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज व दारु पार्टी होत असताना पोलीस प्रशासन काय करत होते? या पार्टीला परवानगी कोणी दिली?, त्याची चौकशी तर करावी लागेलच पण यामागील मास्टर माईंड कोण आहे? याचाही शोध लागला पाहिजे अशी मागणी मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने ड्रग्जच्या विरोधात ठोस कारवाई करून जे कोणी अशा रॅकेटमध्ये सहभागी आहेत त्यांची पाळमुळं खणून काढावी, फक्त कारवाईचा देखावा करू नये असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.JS/ML/MS