mmcnews mmcnews

राजकीय

मत विभाजन टाळण्यासाठी मुस्लिम , मराठा आणि बौद्धांची एकी

जालना दि ३१– मुस्लिम, मराठा आणि बौध्द यांचे एकीकरण करत असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. हे तिन्ही समाज एकत्र येऊन निवडणुका लढवण्यावर आजच्या बैठकीत सहमती झाल्याचेही त्यांनी सांगितले.मुस्लीम धर्मगुरु आणि वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांनी आज आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेतली. या बैठकीला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विभागलेल्या राष्ट्रवादीचा फैसला जनताच करेल

पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आजवर निवडणुका लढला आहे, ज्या जागा मिळाल्या त्याही जनतेनं दिल्या आहेत, त्यामुळे यावेळीही २ भागात विभागलेल्या पक्षाबाबत जनताच न्याय करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस […]Read More

ट्रेण्डिंग

महायुतीतील बंडखोरीचा निकाल दोन दिवसात

मुंबई, दि ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जनता महायुतीसोबत असून राज्यात सरकार महायुतीचेच येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीत जिथे एकमेकांच्या उमेदवारासमोर तिकिट नसताना उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षांतर्गत बंडखोरही आपली उमेदवारी मागे […]Read More

ट्रेण्डिंग

ट्रेनमध्ये AC बंद, पाणी नसेल तर रेल्वे देणार नुकसान भरपाई

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वे सध्या कात टाकून अत्याधुनिक रूप धारण करत आहे. जागतिक दर्जाच्या सेवासुविधा प्रवाशांना देण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र एवढ्या प्रचंड डोलारा सांभाळतानाही सुविधांमध्ये काही तृटी राहून जातात. यासाठी प्रवाशांना नुकसान भरपाई देखील दिली जात आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियम असतात. ट्रेनमध्ये बेसिक […]Read More

देश विदेश

कचऱ्याच्या ट्रकमधून सफाई कामगारांच्या वेशात ट्रम्प यांचा प्रचार

न्यूयॉर्क, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या आपल्या राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे उमेदवार लक्ष वेधण्यासाठी काय काय कुरापती करतात हे आपण पाहत आहात. अशाच प्रकारे सध्या अमेरिकेत प्रचारांची रणधुमाळी माजली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोलाल्ड ट्रप्म नेहमी प्रमाणेच काहीतरी चमत्कारिक करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्यात झालेल्या प्रचार रॅलीमध्ये ते सफाई कामगाराचा […]Read More

ट्रेण्डिंग

कर्करोग रुग्णालयासमोर अन्नदान स्वीकारण्यासाठी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची अट घालणारा अटकेत

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. मात्र अन्न वाटप करताना स्वीकारणाऱ्या व्यक्तीला कोणतीही अट घालणे हे खरोखरच घृणास्पद आहे. त्यातही ही घटना जर आजाराने पिडित रुग्णांच्या नातेवाईकांबाबत घडली असेल तर फारच गंभीर मानली पाहिजे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून अल्प उत्पन्न गटातले कर्करोग ग्रस्त रुग्ण आणि त्यांचे […]Read More

अर्थ

LIC ने थकवला ६५ कोटींचा GST

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : LICसारख्या नावाजलेल्या सरकारी कंपनीकडून कोट्यवधींचा GST थकवला जाणे, ही सर्वसामान्य माणसासाठी निश्चितच धक्कादायक बाब आहे. सामान्य माणसाला GST साठी वारंवार तगादा लावणाऱ्या आणि कर थकल्यास तत्काळ कारवाई करणाऱ्या GST विभागाला LIC सारख्या मोठ्या कंपनीची कोट्यवधींची कर चुकवेगिरी फारच उशिरा लक्षात आल्याचे दिसत आहे. तब्बल ६ वर्षांनी भारतीय आयुर्विमा […]Read More

ट्रेण्डिंग

चतुर्दशी: दिवाळी फराळ नरकचतुर्दशी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळीची सुरुवात करणारी

– राधिका अघोर दिवाळीतला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते, त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. यादिवशी, श्रीकृष्णाने सत्यभामेच्या मदतीने, नरकासुराचा वध करुन, त्याच्या तावडीत असलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांची सुटका केली होती, त्यांना नवे आयुष्य दिले होते,अशी आख्यायिका आहे. त्यावरून, या तिथीला नरकचतुर्दशी असे नाव पडले. त्याशिवाय, नरक म्हणजे स्वर्ग-नरक कल्पनेतील नरकही मानला […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ लेखिका वीणा देव अनंतात विलिन

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा देव (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. वीणा देव या दिवंगत इतिहास अभ्यासक आणि लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर काल रात्री ९ च्या सुमारास पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्य […]Read More

विज्ञान

मंगळावरुन एलियन द्वारा पृथ्वीवर आलेला संदेश डिकोड करण्यात यश

न्यूयॉर्क, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूर्यमालेतील ग्रहांवर पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी असल्याचा कयास वर्षांनुवर्षे शास्त्रज्ञांकडून मांडला जात आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्यासाठी अंतराळात संदेशही पाठवले जातात. या प्रयत्नांना आता यश आले असून मंगळ ग्रहावरुन आलेला रहस्यमयी सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars Trace Gas Orbiter (TGO) ने एलियन मार्फत आलेला […]Read More