दहिसरकरांसाठी आणि पर्यावरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल!

 दहिसरकरांसाठी आणि पर्यावरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल!

मुंबई, दि ११
आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘दहिसर नदी पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा – १)’ आणि ५.० MLD क्षमतेच्या ‘एस.टी.पी. (STP) प्लांट’चे शानदार उद्घाटन आणि पाहणी दौरा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रकल्पामुळे आपल्या दहिसर नदीला एक नवसंजीवनी मिळणार असून, सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीचे प्रदूषण रोखण्यात आपल्याला मोठे यश मिळणार आहे. मुंबईच्या शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक आश्वासक पाऊल आहे!

या ऐतिहासिक क्षणी भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री मा. ना. श्री. पीयूषजी गोयल साहेब यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले. या विशेष प्रसंगी उपमहापौर या नात्याने माझ्यासोबत आमदार सौ. मनीषाताई चौधरी, आमदार श्री. प्रकाशजी सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याला विधी समितीच्या अध्यक्षा सौ. दीक्षा कारकर, प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश दरेकर, नगरसेविका श्रीमती तेजस्वीनी घोसाळकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती योगिता पाटील, डॉ. आदिती खुरसंगे आणि माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रशासकीय स्तरावर महानगरपालिका आयुक्त सौ. अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व श्री. अभिजित बांगर, उप आयुक्त श्री. गिरीश निकम व श्री. मनीष वळंजू, प्रमुख अभियंता श्री. सुनीलदत्त मुकुंद रसाळ, सहाय्यक आयुक्त (आर/उत्तर विभाग) श्री. रोहित त्रिवेदी आणि उप प्रमुख अभियंता श्री. रमाकांत मोरे यांच्यासह शिवसेना-भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दहिसरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखून आपल्या शहराचा विकास करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. या भव्य प्रकल्पासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *