पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला एन डी ए चे शक्तिप्रदर्शन
कोलकाता, दि.९ : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोलकात्यातील ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि एनडीएतील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती ही शक्तिप्रदर्शनाची ठळक झलक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच इतर एनडीए नेते उपस्थित होते.
सुवेंदू यांनी बंगाली भाषेतून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.सुवेंदु अधिकारी यांच्यासह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशीथ प्रामाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधी सोहळा पार पडण्यापूर्वी शुभेंदू अधिकारी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते, “पश्चिम बंगालसाठी ही खरोखरच ऐतिहासिक सकाळ आहे. दूरदर्शी नेते, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘सीटी ऑफ जॉय’ कोलकात्यात आपले स्वागत आहे.””हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आज स्वातंत्र्यानंतर प्रथमच पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. आमच्या संस्थापकांची स्वप्ने साकार होताना आम्ही पाहत आहोत.”
सुवेंदू अधिकारी यांना 2020 पर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानलं जायचं. मात्र पक्षात अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावामुळे ते हळूहळू बाजूला पडले होते. त्यानंतर 2021च्या निवडणुकीच्या आधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
SL/ML/ SL