सर्वपक्षीय नगरसेवकांना वाढीव निधी!
मुंबई, दि १०: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सर्वपक्षीय गटनेते आणि नगरसेवकांना भरघोस वाढीव विकास निधी देण्यात आल्याने सर्वच पक्षांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांना सर्वाधिक १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मनसे आणि ठाकरे गटातून राजकीय प्रवास करत भाजपमध्ये दाखल झालेल्या अर्चना भालेराव यांना तब्बल १० कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यात आला आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पावर तब्बल ९४ तास चर्चा झाली असून १८८ नगरसेवकांनी विविध विषयांवर मते मांडली. या चर्चेदरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभागातील विकासकामांसाठी अधिक निधीची मागणी लावून धरली होती. त्यानुसार प्रशासनाने स्थायी समितीसाठी ८०० कोटी रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध करून दिला आहे.
यापूर्वी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना केवळ २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची टीका झाली होती. तर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रभाग समिती अध्यक्षांनाही अतिरिक्त निधी देण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी अंधेरीतील नगरसेवकांच्या निधीत कपात करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती. त्यानंतर अंधेरीतील सहा प्रभागांतील नगरसेवकांच्या निधीत कपात करण्यात आली. मात्र अर्थसंकल्पीय चर्चेनंतर नगरसेवकांच्या मागणीनुसार पुन्हा वाढीव निधी मंजूर करण्यात आला.
……………….
मिळालेला निधी
शिवसेना (शिंदे गट) गटनेते अमेय घोले : आधी १० कोटी, वाढीव १ कोटी
संध्या दोशी : आधी १० कोटी, वाढीव १ कोटी ९० लाख
भाजपचे रोहन राठोड : आधी ९ कोटी, वाढीव २ कोटी
हेतल गाला : आधी ३ कोटी, वाढीव १ कोटी
नील सोमय्या : आधी २.५० लाख, वाढीव २ कोटी
राखी जाधव : आधी ३ कोटी, वाढीव १० कोटी
मनसेचे यशवंत किल्लेदार : आधी २ कोटी, वाढीव १ कोटी
ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर : आधी २ कोटी, वाढीव १ कोटी
……………
प्रभागनिहाय निधी वाढ
नगरसेवक – प्रभाग – आधीचा निधी आणि वाढीव निधी
रेखा यादव – आर/उत्तर -२.५० लाख आधी – आता १ कोटींची वाढ
तेजस्वी घोसाळकर – आर/उत्तर – २.५० लाख – २ कोटी वाढीव निधी
प्रकाश दरेकर – आर/उत्तर – ५ कोटी – २ कोटींची वाढ
मंगेश पांगारे – आर/उत्तर – २.५० लाख – १ कोटी वाढ
संजय घाडी – आर/उत्तर – १० कोटी – वाढीव २ कोटी
दीक्षा कारकर – आर/उत्तर – ३ कोटी – वाढीव २ कोटी
योगिता पाटील – आर/उत्तर – २.५० लाख – २ कोटी वाढीव निधी
शिवानंद शेट्टी – आर/मध्य – २.५० लाख – २ कोटी वाढीव निधी
जितेंद्र पटेल – आर/मध्य – २.५० लाख – २ कोटी वाढीव निधी
डॉ. अदिती खमसंगे – आर/मध्य – २.५० लाख – १ कोटी वाढीव निधी. KK/ML/MS