mmcnews mmcnews

देश विदेश

Scale AI मधील ७०० कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी गमावली नोकरी

AI च्या आगमनामुळे अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याचा अंदाज आता खरा ठरत आहे. स्केल एआय या वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपनीने आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे 14 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. त्यामुळे ही कपात टेक उद्योगात खळबळ माजवणारी ठरली आहे. मेटाकडून 14 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 1.16 लाख कोटी रुपये इतका प्रचंड निधी मिळाल्यानंतर अवघ्या […]Read More

बिझनेस

BMW ची सर्वात स्वस्त कार भारतात लाँच

मुंबई,दि. १८ : BMW इंडियाने आज भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू २ सिरीज ग्रॅन कूपचे अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. दुसऱ्या पिढीची ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी आहे आणि नवीन वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. सुरक्षेसाठी ट्रॅक्शन कंट्रोल आणि लेव्हल-२ अडास सारखी वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने ही कार २१८एम स्पोर्ट आणि २१८एम स्पोर्ट प्रो या दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे. […]Read More

बिझनेस

Airtel च्या ग्राहकांना Perplexity Pro’ चे १७ हजारांचे सबस्क्रीप्शन मोफत

मुंबई, दि. १८ : देशातील आघाडीचे नेटवर्क भारती एअरटेलने आपल्या पात्र ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. आता एअरटेल ग्राहक तब्बल17 हजार रुपये किमतीचे ‘Perplexity Pro’ सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळवू शकतात. सध्या चॅटजीपीटी आणि जेमिनी सारखे एआय चॅटबॉट्स लोकप्रिय झाले आहेत. पर्प्लेक्सिटी हे एक एआय-चालित सर्च इंजिन आहे. हे तुम्हाला इंटरनेटवरून माहिती गोळा […]Read More

राजकीय

भास्कर जाधवांची विधानसभेत दिलगिरी…

मुंबई दि १८ — काल विधानसभेत शिवसेना उबाठा पक्षाच्या आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी हातवारे करून वक्तव्य केली आणि सभागृहाबाहेर देखील माध्यमांसमोर अध्यक्षांबाबत वक्तव्ये केली ही अश्लील पद्धतीची होती , त्यांनी माफी मागावी अन्यथा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करावे अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे यांनी केली. त्यावर भास्कर जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली. […]Read More

राजकीय

महायुती सरकारला सत्तेचा माजमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि १८महायुती सरकारला सत्तेचा माज असून या सत्तेमध्ये चड्डी बनियान गँग असून हीच चड्डी बनियान गँग हे सरकार चालवत आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ते पुढे म्हणाले या सरकारच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून या सरकारन राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण […]Read More

राजकीय

विधिमंडळात आता आमदारांसाठी नीतिमूल्ये समिती….

मुंबई दि १८ — विधिमंडळात काल झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे विधिमंडळाची मोठी बदनामी झाली आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता संसदेतील नीतिमूल्य समितीच्या धर्तीवर इथेही अशी समिती विधानपरिषद सभापतींशी चर्चा करून निर्माण केली जाईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. यासोबतच पुढील अधिवेशनापासून केवळ विधीमंडळ सदस्य ,त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच विधीमंडळ परिसरात […]Read More

राजकीय

मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद ….

मुंबई दि १८– सर्वंकष प्रगतिशील महाराष्ट्र बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे, मुंबई महानगराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या असंख्य योजना राबविण्यात येत आहेत,मुंबई महाराष्ट्रापासून पुढील हजारो वर्षे कोणीही तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला […]Read More

महानगर

इतर चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी

मुंबई, दि १८.विधान भवन प्रवेशद्वार आंदोलनआज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं.मागणी इतर चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही!आम्ही शांततेत, पण ठामपणे लढत आहोत! न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील! असे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी सांगितले. KK/ML/MSRead More

राजकीय

खासदार संजय दिना पाटील रेल्वे विभागाच्या कामकाजावर नाराज

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) – घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी पडलेले भंगार साहित्य व डेब्रिज वर्षानंतरही उचलण्यात न आल्याने रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. पडलेल्या भंगार साहित्य व डेब्रिज मध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने त्या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी स्थानिक नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डेब्रिज उचलण्याबाबत रेल्वे […]Read More

महानगर

आणि कासवाने पुन्हा शर्यंत जिंकली…

पनवेल, दि.१८ :– ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे. अशीच एक महत्वाची म्हणजे जीवन मरणाची शर्यत आज कासवाने पुन्हा जिंकली असून कासव पुन्हा वडाळे तलावात आपल्या मुक्कामी सुखरूप पोहचले. या संदर्भातली अधिक माहिती अशी, वडाळे तलाव परिसरात एका कासवाच्या तोंडात गळ अडकल्याची माहिती मुकुंद कोळी यांनी अग्निशमन केंद्राला दिली. अग्निशमन विभागाचे […]Read More