जयकुमार गोरे भाऊंच्या फटकेबाजीने रंगली मुंडे चषक स्पर्धेची सुरुवात

 जयकुमार गोरे भाऊंच्या फटकेबाजीने रंगली मुंडे चषक स्पर्धेची सुरुवात

सातारा. दि. २६: एनकूळ (ता. खटाव) येथे ब्रह्मचैतन्य फाउंडेशन आयोजित लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मैदानावर उत्साह ओसंडून वाहत होता. उद्घाटनानंतर आयोजकांच्या आग्रहास्तव जयकुमार गोरे यांनी स्वतः बॅट हातात घेत मैदानात उतरून दमदार फटकेबाजी करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या फलंदाजीमुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

ही स्पर्धा ग्रामीण भागातील युवकांना क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळात आपली कौशल्ये दाखवण्याची संधी देणारी ठरत असून, अनेक होतकरू खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये संघभावना, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.;या स्पर्धेमुळे गावागावातील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळत असून, ग्रामीण क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *