शेअर बाजारातील दोन आठवड्यांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे सावट

 शेअर बाजारातील दोन आठवड्यांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे सावट

जितेश सावंत

गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारात दिसलेली सलग तेजी अखेर मंदावली आहे. २४ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार लाल निशाणात बंद झाला असून, पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला बाजार सकारात्मक असला तरी, मध्यंतरात जागतिक घडामोडींमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सुमारे २% ची घसरण नोंदवण्यात आली. आयटी क्षेत्रातील विक्रीचा दबाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींनी बाजाराला बॅकफूटवर आणले.

बाजारावर दबाव आणणारे प्रमुख ५ घटक

१. ‘Strait of Hormuz’ मधील तणाव
अमेरिका आणि इराणमधील चर्चा ठप्प झाल्याने ‘Strait of Hormuz’ मधील तेलपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. यामुळे ब्रेंट क्रूडचे दर आठवडाभर $१०३ ते $१०७ प्रति बॅरल या उच्च पातळीवर राहिले. कच्च्या तेलातील या ८-१०% उसळीमुळे भारतासाठी महागाई आणि आयात बिल वाढण्याचे संकट उभे ठाकले आहे.

२. परकीय गुंतवणूकदारांची (FII) सलग विक्री:
परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी या आठवड्यातही ₹१७,१४० कोटींची विक्री केली आहे. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात आतापर्यंत ₹५६,३६० कोटींचा निधी बाजारातून बाहेर गेला असून, विक्रीचा हा सलग १० वा महिना आहे.

३. रुपयाची कमजोरी:
वाढते आयात बिल आणि परकीय निधीचा बाहेर जाणारा ओघ यामुळे रुपयावर प्रचंड दबाव आहे, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारातील सेंटिमेंट्सवर होत आहे.

४. महागाईची भीती:
कच्चे तेल $१०५ च्या पार गेल्यामुळे मालवाहतूक खर्च वाढून महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम कंपन्यांच्या आगामी तिमाही निकालांतील नफ्यावर (Margins) होऊ शकतो.

५. मर्यादित देशांतर्गत आधार (DII Support):
देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) एप्रिलमध्ये आतापर्यंत ₹३९,४८० कोटींची गुंतवणूक करून बाजाराला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र जागतिक स्तरावरील विक्रीच्या प्रचंड दाबापुढे हा आधार अपुरा ठरला.

पुढील आठवड्यातील महत्त्वाचे ‘ट्रिगर्स’:

जागतिक बँकांचे निर्णय: US फेडरल रिझर्व्हचा व्याजदर निर्णय आणि बँक ऑफ जपानचे संकेत.
तिमाही निकाल (Q4 Results): रिलायन्स इंडस्ट्रीजसह १८० हून अधिक कंपन्यांचे निकाल.
आर्थिक आकडेवारी: २८ एप्रिलचा IIP डेटा आणि १ मे रोजी जाहीर होणारे परकीय चलन साठे (Forex Reserves).

सध्या बाजार ‘ओव्हरसोल्ड’ (Oversold) मध्ये आहे तांत्रिकदृष्ट्या पाहता, येत्या काळात बाजारात एक ‘Technical Bounce’ येण्याची शक्यता आहे तथापि, प्रत्येक रॅलीवर विक्रीचा दबाव असेल.

The market is currently oversold, and Nifty may gradually move upward. However, there will be selling pressure during each rally

गुंतवणूकदारानी प्रत्येक पडझडीचा लाभ घ्यावा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे.

अशा अस्थिर परिस्थितीत गुंतवणूकदारांनी स्टॉक-स्पेसिफिक राहा.सरसकट गुंतवणूक करण्याऐवजी मजबूत कंपन्यांची निवड करा.लेव्हरेज टाळा.नफा मिळवण्यापेक्षा सध्या भांडवल वाचवण्याला (Capital Preservation) प्राधान्य द्या.

जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होत नाहीत आणि परकीय गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत बाजारात मोठी तेजी येणे कठीण आहे.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 23898
KeySupportLevels 23739,23580 and 23346 Breaking these could lead Nifty to further lower levels
Resistance Levels: 23972 24131,24364 and 24523. These resistance levels are crucial for Nifty.
The Indian equity markets faced a sharp reversal as the two-week winning streak ended on April 24, 2026, with the Sensex and Nifty both declining by approximately 2%. This downturn was primarily driven by escalating geopolitical tensions in the Middle East, specifically concerns surrounding the Strait of Hormuz, which pushed Brent crude prices into the $103 to $107 per barrel range. The surge in oil prices has intensified fears of rising inflation and a widening fiscal deficit for India.

The market also remained under significant pressure due to persistent selling by Foreign Institutional Investors (FIIs), who offloaded equities worth ₹17,140 crore during the week. While Domestic Institutional Investors (DIIs) provided some support with consistent inflows, it proved insufficient to counter the global sell-off and the weakening Rupee.
Currently, the markets have entered a technical oversold zone, suggesting the potential for a short-term rebound. However, any sustained recovery will depend on the upcoming US Federal Reserve interest rate decision, global cues, and the ongoing Q4 earnings season. Investors are advised to remain cautious, prioritize capital preservation, and maintain a stock-specific approach amidst this heightened volatility.

लेखक : शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ आहेत.

The author is an expert in the stock market, financial affairs, cyber law, and data protection law.

ईमेल:jiteshsawant33@gmail.com

ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *