मुंबईत थरार, २७ वर्षांपूर्वीच्या एन्काऊंटरचा बदला घेण्यासाठी 78 वर्षीय वृद्धाची हत्या

 मुंबईत थरार, २७ वर्षांपूर्वीच्या एन्काऊंटरचा बदला घेण्यासाठी 78 वर्षीय वृद्धाची हत्या

मुंबई, दि. २५ : मुंबईत 27 वर्षांपूर्वी झालेल्या एका एन्काउंटरचा सूड आता घेण्यात आला आहे. 1999 मध्ये ठार झालेल्या सादिक कालिया या गुंडाच्या पुतण्याने, त्याच्या काकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या खबऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना नागपूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या थरारक सूडाची आणि अटकेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

मुंबईचा कुख्यात गुंड सादिक कालिया हा 1999 मध्ये एका पोलीस चकमकीत मारला गेला होता. या एन्काउंटरसाठी पोलिसांना माहिती देणाऱ्या खबऱ्याचा शोध सादिकचा पुतण्या सादिक जवार गेल्या अनेक वर्षांपासून घेत होता. अखेर 27 वर्षांनंतर त्याने आपल्या काकाच्या हत्येचा सूड पूर्ण केला. 78 वर्षांच्या इक्बाल इब्राहिम सेलिया यांची 20 पेक्षा जास्त वार करून हत्या करण्यात आली. सेलिया यांनीच एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या टीमला सादिक कालियाबद्दल टीप दिली होती, असा आरोप आरोपीने केला आहे.

हत्येची घटना 20 एप्रिलच्या संध्याकाळी नागपाडा परिसरात घडली. सेलिया आपल्या घरी एकटे असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त जखमा होत्या. सेलिया यांचा मुलगा आणि पत्नी जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी अँटॉप हिल, विद्याविहार आणि त्यानंतर कल्याण असा प्रवास केला. तिथून ते नागपूरला पळून गेले होते.

नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला. अवघ्या 4 दिवसांत पोलिसांनी नागपूरमध्ये सापळा रचून सादिक जवार (वय 29) आणि त्याचा साथीदार नौशाद मिथानी (वय 22) यांना अटक केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *