आई-वडिलांनीच अल्पवयीन मुलीला टक्कल करुन घरात डांबलं
अमरावती, दि. २५ : अमरावती जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या सुरक्षिततेच्या नावाखाली पालकांनीच अमानुष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांनीच केस कापून टक्कल केल्याची घटना घडली आहे. मुलीवर कुणाची वाईट नजर पडू नये या कारणावरून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे
ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील असून पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे एका मुलाकडून वारंवार वाईट नजरेने पाहिले जात होते. या संदर्भात तक्रार करण्यासाठी आई-वडिलांनी तिच्यावर दबाव टाकला. मात्र मुलीने तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेत मुलीचे केस कापून टक्कल केले आणि तिला घरातच बसवून ठेवले. या घटनेनंतर मानसिक छळ सहन न झाल्याने मुलीने थेट वरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आई-वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या सदर मुलगी ही आई वडिलाला सोडून आता महिला बालकल्याण समितीकडे आली असून तिच समुपदेशन या ठिकाणी केला जात आहे.
वरुड येथील मुलीवर तिची आई आणि सावत्र बापाने संशय घेऊन मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली. आता आम्ही तिला बालनिरीक्षक गृहात पाठवले आहे. मुलीवर संशय घेत तिच्या आईने आणि सावत्र बापाने पट्ट्याने मारहाण केली आहे इलेक्ट्रॉनिक स्ट्रिमर मशीनने तिचे केस कापले असल्याचं प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी सांगितला आहे.