mmcnews mmcnews

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

दि . २९/७/२०२५ • राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार. (ग्राम विकास विभाग) • ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील […]Read More

खान्देश

कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; कांदे फेकून आंदोलन…

नाशिक दि २९– कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. कांद्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अधिकाऱ्यांनी वेळ न दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर कांदा फेकून आपला रोष व्यक्त केला. तसेच थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदे फोडून आपला निषेध व्यक्त केला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक […]Read More

राजकीय

रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि २९: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने  सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर  कार्यकर्त्यांनी आपले […]Read More

महिला

*’पिंची’च्या मंगळागौर जल्लोषात संपन्न

पिंपरी,: दि २९‘पिंची’ हा पिंपरी -चिंचवड मधील महिलांचा सर्वात मोठा समूह आहे, यांनी आयोजित केलेला मंगलागौर व नागपंचमी स्नेहमेळावा मोठ्या जल्लोषात, उत्साही आणि पारंपरिक वातावरणात नुकताच पार पडला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड परिसरातील असंख्य महिलांनी […]Read More

कोकण

मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटला ; वाहतूक पर्यायी मार्गाने…

रत्नागिरी दि २९:– मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गॅस टँकर रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघातग्रस्त झाला. गॅस टँकरला झालेल्या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा नजीकची दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अपघाताची माहिती मिळताच […]Read More

ट्रेण्डिंग

बत्तीस शिराळ्यात 23 वर्षांनंतर होणार जिवंत नागाची पूजा

सांगली, दि. २८ : उद्या राज्यभर नागपंचमीचा सण साजरा होणार आहे. यामध्ये नागपूजेला विशेष महत्त्व असते. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या गावात जिवंत नागाची पकडून पूजा करण्याची प्रथा होती. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी अनेक जण या गावात नागपंचमीच्या दिवशी येत असतं. पण, या प्रथेला काही संघटनांनी आक्षेप […]Read More

देश विदेश

कंबोडियाने थायलंडसोबत केली युद्धबंदीची घोषणा

बँकॉक, दि. २८ : कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी थायलंडसोबत सुरू असलेल्या सीमा वादात युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी लढाई तात्काळ थांबवण्याची अपेक्षा आहे. या युद्धबंदीमध्ये चीन आणि अमेरिकेने मध्यस्थी केली आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आज दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली. थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि […]Read More

देश विदेश

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसासह तीन दहशतवादी ठार

श्रीनगर, दि. २८ : ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने आज श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. चिनार कॉर्प्सने X वर हे वृत्त दिले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा देखील होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की मारला गेलेला दहशतवादी हाशिम मुसा होता. इतर दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे […]Read More

राजकीय

ओबीसी जनगणनेचे महत्त्व घरोघरी जाऊन सांगणार – समीर भुजबळ

पिंपरी, दि.२८पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. ही जनगणना झाल्यानंतर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींसह आरक्षण, शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण, केंद्र व राज्य सरकारच्या ओबीसींसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मिळेल. हे लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर ओबीसी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात सामील […]Read More

बिझनेस

विकली जाणार VIP कंपनी

मुंबई, दि. २८ : VIP या प्रवासी बॅग व इतर वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी विकण्याचा निर्णय कंपनीची मालकी असलेल्या पिरामल कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांनी या कंपनीतील ३२ टक्के समभाग विकण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मल्टीपल्स इक्विटीने हे समभाग (Indian business new)खरेदी करण्यासाठी व्यवसाय नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला आहे.(Indian company takeover)प्रायव्हेट इक्विटी, संमविभाग सिक्युरिटी, प्रोफिटेक्स शेअर्स […]Read More