Month: March 2024

महिला

१०२ महिलांनी केला एकाच वेळी ड्रोन उडवण्याचा विक्रम

भोपाळ, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आमलात आणत आहे. यांपैकी नमो ड्रोन दीदी योजना हा भारत सरकारचा महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.ग्रामीण भारतातील शेतीशी निगडित महिलांच्या सक्षमिकरणासाठी केंद्र सरकारने ‘नमो ड्रोन दिदी योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बचत गटातील महिलांना […]Read More

देश विदेश

NDRF करणार जंगलातील वणवे आटोक्यात आणण्याचे काम

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या कानाकोपऱ्यात नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांच्या रक्षणासाठी NDRF सदैंव सज्ज असते. देशात पूर, वादळांसारख्या आपत्तीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) नागरिकांच्या मदतीला नेहमी धावून जाते. आता एनडीआरएफ जंगलातील वणवे आटोक्यात आणण्यासाठी योगदान देणार असून दलाने आपल्या १५० जवानांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षणही देऊन तैनातही केले आहे. त्याचप्रमाणे या जवानांना […]Read More

अर्थ

भारताच्या या शेजारी देशात करता येणार UPI पेमेंट

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI हे आता भारतात सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याचा भाग झाले आहे. भारतात दररोज लाखो लोक यूपीआय (UPI) द्वारे पेमेंट करतात. आता हळूहळू यूपीआय जगभर पोहोचत आहे. जगातील अनेक देशांमध्ये यूपीआय पेमेंट सुरू झाले आहे. यामध्ये श्रीलंका, फ्रान्स, मालदीव अशा अनेक देशांच्या नावांचा समावेश आहे. आता भारताचा शेजारील […]Read More

ट्रेण्डिंग

बहुप्रतिक्षित नागरिकत्व सुधारणा कायदा आजपासून लागू

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आता विविध महत्त्वपूर्ण निर्णय हातावेगळे करण्यास सुरुवात केली आहे. मतदारांना याआधी आश्वासन दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनपूर्ती करण्यास मोदी सरकार सज्ज झाले आहे. भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सीएएचा जाहीरनाम्यात समावेश केला होता. पक्षाने हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित देखील केला होता. आज […]Read More

पर्यावरण

कुनो नॅशनल पार्कमधून गुड न्यूज

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चित्तेने आनंदाची बातमी दिली आहे. उद्यानातील गामिनी या मादी चित्तेने 5 पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केले आहेत. 5 पिलांच्या जन्मानंतर भारतात जन्मलेल्या पिल्लांची संख्या 13 झाली आहे. […]Read More

पर्यटन

राजस्थानच्या उत्तर भागात स्थित एक पवित्र शहर, अजमेर

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अजमेर हे राजस्थानच्या उत्तर भागात स्थित एक पवित्र शहर आहे. हे अजमेर शरीफ दर्गाहसाठी प्रसिद्ध आहे, जे एक प्रसिद्ध सुफी दर्गा आहे. अजमेरमध्ये भेट देण्याच्या इतर काही प्रसिद्ध ठिकाणांमध्ये अधाई दिन का झोनप्रा, आना सागर तलाव आणि नसियान जैन मंदिर यांचा समावेश आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते […]Read More

विज्ञान

मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड; मोबाईल फोन (भ्रमणध्वनी)

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठळक मुद्दे: • भारतात विक्री होणाऱ्या सर्व मोबाईल फोनपैकी 97% स्वदेशी निर्मित  • 30% उत्पादन निर्यातक्षम. • पीएलाय योजना जागतिक उद्योजकांना आकर्षित करते, उत्पादन वाढवते. एका दशकात भारतात मोबाईल फोन उत्पादनात झालेली वाढ म्हणजे जणु उत्पादन क्षेत्रातील अतुलनीय यशोगाथा होय. वर्ष 2014 मध्ये देशात विक्री झालेल्या एकूण मोबाईल […]Read More

देश विदेश

निवडणूक रोख्यांची माहिती उद्याच द्या , सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक रोखे प्रकरणी (Electoral Bonds) सर्वोच्च न्यायलयाने SBI मोठा धक्का दिला आहे. 24 तासांच्या आत, अर्थात उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती द्या, असे आदेश न्यायालयाने SBI ला दिले आहेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसल्याची चर्चा सुरू आहे. निवडणूक रोखे तपशील प्रकरणी माहिती देण्यासाठी जूनपर्यंत […]Read More

महानगर

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील झालेले निर्णय

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या (सोमवार दि.११ मार्च, २०२४) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील झालेले महत्त्वाचे निर्णय. ML/ML/SL 11 March 2024Read More

राजकीय

मुंबई कोस्टल रोडची दक्षिण मार्गिका झाली खुली

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड ची दक्षिण मार्गिका म्हणजेच वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज अंशतः खुली करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे […]Read More