बहुप्रतिक्षित नागरिकत्व सुधारणा कायदा आजपासून लागू

 बहुप्रतिक्षित नागरिकत्व सुधारणा कायदा आजपासून लागू

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आता विविध महत्त्वपूर्ण निर्णय हातावेगळे करण्यास सुरुवात केली आहे. मतदारांना याआधी आश्वासन दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनपूर्ती करण्यास मोदी सरकार सज्ज झाले आहे. भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सीएएचा जाहीरनाम्यात समावेश केला होता. पक्षाने हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित देखील केला होता. आज अखेर केंद्र सरकारने सीएएची अधिसूचना जारी केली असून देशात सीएए केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात अधिसूसचा जारी केली आहे.

या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमधून आलेल्या अल्पसंख्याक शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळू शकेल. या देशांमधल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, आणि पारशी धर्मीय शरणार्थींना या कायद्याचा लाभ मिळेल. यासाठी त्यांना केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करावा लागेल.

गेल्या काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक भाषणात सीएए लागू करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे केंद्र सरकार निवडणुकीच्या आधी याची अधिसूचना जारी करेल अशी चर्चा होती. त्यानुसार आता केंद्राने याची अधिसूचना जारी केली आहे.

सीएए कायदा २०१९ साली संसदेत मंजूर करण्यात आला आहे.CAAमुळे मुस्लिम धर्माव्यतिरिक्त भारताच्या शेजारी असलेले ३ मुस्लिम देशातून देणाऱ्या अन्य धर्मातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळू शकेल. यासाठी केंद्र सरकारने एक वेब पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल नोटिशिकेशननंतर लॉन्च केले जाईल. यात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ३ देशातील नागरिकांचा समावेश असेल. वेब पोर्टवर नोंदणी केल्यानंतर आणि सरकारकडून तपासणी प्रक्रिया पार पाडल्यानंतर संबंधित व्यक्तीला भारताचे नागरिकत्व मिळेल. वरील ३ देशातून आलेल्या व्यक्तीला अल्पसंख्यांक असल्याचे कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ३ देशातील सहा अल्पसंख्यांक हिंदू, शिख, जैन, बैद्ध,पारसी आणि ख्रिश्चन या धर्मातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याची तरदूत CAA कायद्यात केली आहे.

SL/KA/SL

11 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *