mmcnews mmcnews

देश विदेश

पहलगाम प्रकरणी दोन अतिरेक्यांची घरे उध्वस्त

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता धडक कारवाई करत आहेत. एनआयएने जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस व एनआयएचं एक पथक आसिफच्या त्राल (काश्मीर) घरी धडकलं. पहलगाम हल्ल्यात सहभागी दोन […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमपासून वाचवण्यासाठी GenS Life चे विशेष App

सध्या देशभर सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे.यात बरेचदा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केले जाते. यावर ठोस उपाय म्हणून GenS Life ने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवण्याच्या वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबरशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त असे एक ऍप आहे. ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा परिपूर्ण अनुभव घेता […]Read More

विज्ञान

ISRO ला स्वावलंबी करणारे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांचे निधन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे आज (शुक्रवार, २५ एप्रिल) सकाळी बेंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. कस्तुरीरंगन यांना दोन वर्षांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता आणि तेव्हापासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

ग्रॅच्युटी देण्यास विलंब केल्यास दहा टक्के व्याज देणे बंधनकारक

मुंबई उच्च न्यायालयाने आज कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या हक्काबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिला आहे. कोणतीही संस्था अथवा कंपनी कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युईटीची रक्कम एका महिन्यापेक्षा अधिक काळ रोखू शकत नाही. जर एका महिन्यापेक्षा अधिक विलंब केला गेला तर संबंधित संस्था वा कंपनीने कर्मचाऱ्याला ग्रॅच्युईटीच्या रकमेवर वार्षिक दहा टक्के व्याज देणे बंधनकारक राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय […]Read More

ट्रेण्डिंग

Paytm Gold ची फक्त ९ रुपयांत सोन्यात गुंतवणूक करण्याची ऑफर

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोने महागले असले तरीही अक्षय्य तृतीया या साडेतीन मुहूर्तावर थोडे तरी सोनो खरेदी करावे अशी लोकांची इच्छा असते. यासाठी Paytm (वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड) ने ‘गोल्डन रश’ नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश लोकांना डिजिटल पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे आहे. तुम्ही पेटीएम गोल्डमध्ये […]Read More

पर्यटन

शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड, अमरावती विमानतळाचा विस्तार

मुंबई, दि. २५ – – आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 91 वी बैठक सह्याद्री अतिथीगृहातील […]Read More

राजकीय

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

मुंबई दि २५–महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील […]Read More

राजकीय

सावरकरांवरील वक्तव्य , राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

प्रतिनिधीनवी दिल्ली, 25 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधाणावर तीव्र नाराजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना ताकिद दिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांनी आयुष्य पणाला लावले हे आपण विसरता कामा नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लखनौ न्यायालयाने बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका […]Read More

पर्यावरण

तापमानाच्या उच्चांकमुळे ताडोबा दुपार सफारीच्या वेळेत बदल

चंद्रपूर दि २५:– चंद्रपुरात तापमानाच्या उच्चांकामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुपार सफारीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दुपारची सफारी २:३० ते ६:३० वाजता ऐवजी आता दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजता अशी करण्यात आली आहे. हा बदल १ मेपासून करण्यात येणार होता. पुढील आदेशापर्यंत नव्या वेळेनुसारच सफारी होणार आहे. सकाळच्या सफारीत कोणताही बदल झालेला नाही. […]Read More

Uncategorized

विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांच्या झाल्या नियुक्त्या…

मुंबई दि. २४ — महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पध्दतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक […]Read More