mmcnews mmcnews

राजकीय

महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

मुंबई दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका […]Read More

पर्यटन

शाश्वत पर्यटन – निसर्गाचं रक्षण करताना प्रवासाचाही आनंद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):सुट्टी म्हणजे पर्यटन आणि पर्यटन म्हणजे निसर्गाचा सानिध्यात वेळ घालवणं – पण आता यामध्ये एक नवी जागरूकता आली आहे, ती म्हणजे ‘शाश्वत पर्यटन’. यामध्ये पर्यावरणाचा कमीत कमी नाश करत प्रवास करणं, स्थानिक संस्कृतीचा आदर राखणं आणि स्वच्छता टिकवणं यावर भर असतो. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पर्यटकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, स्थानिक मालाचा वापर […]Read More

पर्यटन

अंजनेरी – नाशिकजवळील हनुमान जन्मभूमीचा रहस्यपूर्ण डोंगर

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):नाशिकपासून सुमारे २० किमी अंतरावर अंजनेरी नावाचा डोंगर आहे, जो श्री हनुमानाची जन्मभूमी मानला जातो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा डोंगर गिर्यारोहक आणि धार्मिक प्रवाशांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. अंजनेरी डोंगरावर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तासांचा ट्रेक लागतो. उंचीवरून दिसणारा नाशिकचा नजारा आणि निसर्गाचं सौंदर्य मन मोहवून टाकतं. येथे हनुमानाची गुहा आणि अंजनी […]Read More

राजकीय

सौर उर्जा प्रकल्पातील विकासकाच्या समस्यांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

मुंबई,दि.२४ :– शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2025 वर्षात सात हजार मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विकासकांनी 100 दिवसाला 690 मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना 746 मेगावॅट सौर उर्जा निर्मिती केली. यामध्ये दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लक्ष्यांक पूर्ण […]Read More

शिक्षण

राज्याच्या उच्च शिक्षणात होणार मोठा बदल, MahaSARC ची स्थापना

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून निर्णयांचा सपाटा लावला जात आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबत विविध निर्णय घेतले जात असताना आता राज्याच्या उच्च शिक्षणातही मोठे बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट्स एक विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात सहज हस्तांतरित करता यावेत यासाठी […]Read More

देश विदेश

पहलगाम हल्ल्यातील पिडितांच्या चौकशीसाठी IB आणि NIA टिम डोंबिवलीत दाखल

डोंबिवली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली येथील रहिवासी अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले यांचा हकनाक बळी गेला. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. कुटुंबियांनी दहशतवाद्यांना अगदी जवळून पाहिले असल्याने तपासात मदत व्हावी यासाठी आता IB […]Read More

देश विदेश

पाकीस्तानी अभिनेत्याच्या या आगामी चित्रपटावर बंदी

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर आता देशभर पाकीस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने पाकच्या नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या अबिर-गुलाल हा येत्या ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील […]Read More

देश विदेश

पहलगाम हल्ल्याबाबत पार पडली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी (दि. २२) रोजी काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काल दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. काल सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनतर संध्याकाळी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर आज संध्याकाळी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित […]Read More

सांस्कृतिक

मुंबईत रंगणार भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

मुंबई दि. २४ :– सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून, मुख्यमंत्र्यांचे […]Read More

महानगर

नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळांवर विल्हेवाट लावावी

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क):छोट्या व मोठ्या नाल्‍यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळावर विल्हेवाट लावावी, आवश्यक त्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ चा वापर करावा. पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाला दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचा […]Read More