ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमपासून वाचवण्यासाठी GenS Life चे विशेष App

सध्या देशभर सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे.यात बरेचदा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केले जाते. यावर ठोस उपाय म्हणून GenS Life ने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवण्याच्या वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबरशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त असे एक ऍप आहे. ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा परिपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी त्यांना सक्षम बनवणारा हा एक टेक्नॉलॉजी- सक्षम आणि आकर्षक प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्र सायबरने नमूद केले आहे की सायबर गुन्ह्यांच्या दररोज 5000 तक्रारी नोंदल्या जातात.
याचा अर्थ दर मिनिटाला 4 सायबर गुन्हे घडत आहेत. सध्या सगळ्यात जास्त आढळणारा घोटाळा म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’, ज्यामध्ये गुन्हेगार स्वतः कायदा अंमलबजावणी अधिकारी असल्याचे सांगून आणि कायदेशीर कार्यवाहीच्या धमक्या देऊन वृद्धांकडून पैसे उकळतात.
या वाढत्या धोक्याविषयी टिप्पणी करताना GenS Life च्या संस्थापिका मीनाक्षी मेनन म्हणाल्या, “आपल्या ज्येष्ठांना केवळ सहानुभूतीचीच नाही, तर चांगल्या आणि स्मार्ट सुरक्षेची देखील आवश्यकता आहे. GenS Life मध्ये आम्ही विम्याची शिक्षण आणि मदतीशी सांगड घालून हे सुनिश्चित
करण्याचा प्रयत्न करत आहोत की, ज्येष्ठांना ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षित वाटेल आणि आत्मविश्वास वाटेल. आजच्या डिजिटल युगात परिपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्हाला वाटते की वयाच्या साठीनंतर आपल्या मर्जीने जीवन जगता यायला हवे.
त्यांच्या भावनिक, आर्थिक, जीवनशैलीविषयक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणारी सर्वांगीण ईकोसिस्टम उभारण्याच्या आमच्या व्यापक मिशनशी हे सुसंगत आहे.”