mmcnews mmcnews

राजकीय

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यात आमदार पंकज भुजबळ यांच्या

येवला, DI २५ -* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीच्या वतीने राज्यभरात जनविश्वास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला शहरातील जनता विद्यालयात, अंगणगाव येथील मायबोली संस्था व उपजिल्हा रुगणालय परिसरात वृक्षारोपण करण्यात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

“साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण खोरे

पुणे दि २५:–  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने “साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व पत्रकार अरुण खोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम […]Read More

खान्देश

कारमधून ६० कोटींचे ॲम्फेटामाइन जप्त; ३९ किलोचा साठा

जळगाव दि २५– धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका कारमधून ‘ॲम्फेटामाइन’ या ड्रग्जचा तब्बल ३९ किलो साठा पोलिसांनी हस्तगत केला. त्याची किमत ६० कोटी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई झाली. या ड्रग्जची दिल्लीहून इंदूर, धुळे, संभाजीनगरमार्गे बंगळुरुकडे तस्करी सुरू होती. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा […]Read More

कोकण

रायगडातील २८ धरणांपैकी २३ धरणे १००% टक्के तुडुंब.

अलिबाग दि २५– रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. आज देखील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून रात्रीपासूनच पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २३ धरणे ही जुलै अखेरीसच तुडुंब भरली आहेत. येत्या ऑगस्ट अखेरीस २८ पैकी २८ धरणे […]Read More

देश विदेश

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम

सॅन फ्रान्सिस्को, दि. २५–अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, […]Read More

राजकीय

रविंद्र चव्हाण यांनी घेतली अमित शहा यांची भेट

नवी दिल्ली दि २५– महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी दिल्ली येथे काल केंद्रीय गृहमंत्री अमित यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहा यांनी चव्हाण यांना त्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या , तसेच यावेळी महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर ही सविस्तर चर्चा करण्यात आली. ML/ML/MSRead More

राजकीय

मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 100 तरुणींना केली सायकल वाटप

मुंबई, दि २४महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लेक लाडकी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र धुमाळे यांच्यावतीने १०० लेकींना वडाळा येथे सायकल वाटप करण्यात आल्या. आम्ही दरवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपून आम्ही विभागातील तरुणींना […]Read More

देश विदेश

भारताचा इंग्लंडसोबत मुक्त व्यापार करार. या वस्तू होणार स्वस्त

लंडन, दि. २४ : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी मुक्त व्यापार करारावर सही केली. दोन्ही देशांसाठी आणि खासकरून भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरीफ लादल्यानंतर भारताने त्यातून मार्ग काढण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले होते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ब्रिटेनसोबत मुक्त व्यापारी कराराच्या चर्चांना चालना देणे हा […]Read More

करिअर

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीची संधी

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून (Border Road Organisation) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.एकूण रिक्त जागा : 466ड्राफ्ट्समनशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआयएकूण जागा – 16वयोमयादा : 18 ते 27 वर्षेअर्ज करण्याची तारीख – अद्याप जाहीर नाहीअधिकृत वेबसाईट- bro.gov.in टर्नरशैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा किंवा आयटीआयएकूण जागा – 10वयोमयादा : 18 ते 27 वर्षेअर्ज […]Read More

ट्रेण्डिंग

माथेरान दरीत अडकलेल्या कुत्र्याला गिर्यारोहकांनी वाचवले

माथेरान, दि. २४ : येथील एको पॉईंट येथील दरीत एक कुत्रा तीन दिवस आधी कोसळून झाडाला अडकलेल्या अवस्थेत होता. एका झाडाला अडकून पडलेला हा मुका प्राणी तीन दिवस पावसात भिजल्याने भुकेने ओरडत होता.मात्र या मुक्या प्राण्याला सह्याद्री आपदा संस्थेच्या सदस्यांनी सुखरुपपणे जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. या आपदा संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत […]Read More