mmcnews mmcnews

महानगर

वर्सोवा- भाईंदर किनारी रस्त्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी

मुंबई, दि. २५ : वर्सोवा ते भाईंदरदरम्यान या प्रस्तावित रस्त्यासाठी शासकीय व खासगी जमिनींचे तातडीने संपादन करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (सीआरझेड वगळता) भागात सुरू करण्यात येणार आहे. संबंधित प्रकल्पासाठी विविध परवानग्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या पार्श्वभूमीवर […]Read More

ट्रेण्डिंग

भारतातून नोकरभरती करू नका- ट्रम्प यांचा आदेश

वॉशिग्टन डीसी, दि. २५ : गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आयटी कंपन्यांनी भारत, चीनसारख्या देशातील नोकरभरती कमी करून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरू करणे आणि भारतातून कर्मचाऱ्यांची भरती करणे थांबबावे, असा अशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये आता भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. “अमेरिकन कंपन्यांनी […]Read More

अर्थ

1 ऑगस्टपासून होणार UPI च्या नियमांमध्ये मोठे बदल

मुंबई, दि. २५ : 1 ऑगस्ट, 2025 पासून UPIच्या नियमांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल GPay, PhonePe, Paytm यांसारखे ॲप्स वापरणाऱ्या सर्व ग्राहकांवर लागू होतील. हे बदल UPI सेवा अधिक चांगली, सुरळीत आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी करण्यात येत आहेत. 30 जून 2025 पासून एक महत्त्वाचा बदल आधीच लागू झाला आहे. तो म्हणजे आता तुम्ही […]Read More

देश विदेश

Ullu-ALTT 25 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी

नवी दिल्ली,दि. २५ : अनिर्बधपणे पसरणाऱ्या OTT वरील मजकूरावर आता केंद्र सरकार करडी नजर ठेवत आहे.केंद्र सरकारने आज अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे की हे अ‍ॅप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करत होते. सरकारने एक अधिसूचना जारी करून इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) हे OTT अॅप्स आणि […]Read More

पर्यावरण

देशातील पहिल्या हायड्रोजन इंजिनची चाचणी यशस्वी

चेन्नई, दि. २५ : भारताने हायड्रोजन इंजिनवर चालणाऱ्या रेल्वे कोचची यशस्वी चाचणी घेऊन स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. २५ जुलै २०२५ रोजी, चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे पहिल्या “Driving Power Car” चा यशस्वी स्टॅटिक टेस्ट रन पार पडला. ह्या कोचमध्ये हायड्रोजन इंधनाचा वापर करून इंजिन सुरू करण्यात आले, ज्यामुळे बाह्य वातावरणात फक्त […]Read More

महानगर

आधी देशभक्ती दाखवा आणि मग निदर्शने करा, उच्च न्यायालयाने मार्क्सवाद्याना

मुंबई, दि. २५ : देशातील समस्या सोडून परदेशांतील प्रश्नांसाठी आंदोलनास सज्ज असलेल्या मार्क्सवाद्यांना आज न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली आहे. हजारो मैल दूरच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या देशाला सतावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा. गाझा आणि पॅलेस्टाईनमधील समस्यांकडे पाहण्याऐवजी स्वतःच्या देशाकडे पाहा. देशभक्त व्हा, असा टिप्पणीवजा सल्ला उच्च न्यायालयाने आज भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) दिला. […]Read More

महानगर

मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’

मुंबई दि २५ :– राज्य सरकारने थेट जनतेच्या दारी पोहोचावे यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वरळी येथे ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’ आयोजित केले होते. परळ व भायखळानंतर वरळीमध्ये आयोजित केलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मुंबईमध्ये सदर शिबिरे टप्प्याटप्प्याने राबवली जात आहेत. आज वरळी येथील […]Read More

महानगर

धारावीच्या शाळेत दीप पूजनात उजळले युनोस्कोने गौरविलेले शिवरायांचे १२ किल्ले..

मुंबई, दि २५ – येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि राजे शिवाजी विद्यालयात काल पारंपरिक पध्दतीने दीप आमावस्या निमित्त दीप पूजन करण्यात आले.छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकतेच समाविष्ट केले.याचा आनंदोत्सवही या दीप पूजनाच्या वेळी विद्यार्थी शिक्षकांनी साजरा केला.शिवरायांचे किल्ले म्हणजे शौर्यांची प्रतिके,शौर्यांच्या आजही तेवत राहणाऱ्या ज्योतिच आहेत.असे मानत विद्यार्थी शिक्षकांनी […]Read More

महानगर

श्रावण महोत्सवाची भव्य पाककला स्पर्धा

मुंबई, दि. 25 : आजपासून सुरू होत असलेला श्रावण महिना म्हणजे सणवार आणि पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल. या निमित्ताने मिती ग्रुपद्वारे श्रावण महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचं हे अकरावं वर्ष असून, राज्यभरातील महिलांना आपल्या पाककलेचं प्रदर्शन करण्यासाठी आणि विविध बक्षिसं जिंकण्यासाठी एक जबरदस्त संधी देणारी ही भव्य पाककला स्पर्धा ठरणार आहे. […]Read More

कोकण

कर्नाळा बँक घोटाळा, विवेक पाटील यांच्या मालमत्तेचा लिलाव…..

पनवेल दि २५– रायगड जिल्ह्यात पनवेल, उरणमधील राजकारणाला वेगळी कलाटणी देणाऱ्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी माजी आमदार विवेक पाटील यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.पनवेलची प्रसिध्द कर्नाळा स्पोर्ट्स अकँडमी आणि खालापूर तालुक्यातील पोसरी येथील १०२ एकर जमिनीच्या लिलाव केलेल्या रक्कमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसुल केली जाणार आहे. चार वर्षांपासून अटकेत […]Read More