mmcnews mmcnews

क्रीडा

२८-२९ मार्चला महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सोलापूर, दि. १७ : येथे २८ आणि २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने तीन […]Read More

ट्रेण्डिंग

धुरंधर 2 – ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सर्व शोज हाऊसफुल

मुंबई, दि. १७ : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर- १ च्या प्रचंड यशानंतर त्याचा दुसरा भाग ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शित व्हायला आता दोन दिवस राहिले आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल झाले आहेत. जगभरातील ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनच्या बाबतीत रणवीर सिंहचा हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडत आहे. ‘धुरंधर 2’चे लाखो तिकिट्स विकले […]Read More

महानगर

जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर कचऱ्याचे ढिग

मुंबई, दि. १७ : मुंबईच्या अगदी नजिक समुद्रात वसलेले घारापुरी अर्थात एलिफंटा हे जागतिक वारसा स्थळ सध्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे त्रस्त झाले आहे. काल राबवण्यात आलेल्या एका विशेष स्वच्छता मोहिमेत ५०० मीटरच्या परिघातून २.५ टन कचरा हटवण्यात आला. या मोहिमेने मुंबई आणि आसपासच्या सागरी प्रदूषणाची भयावह स्थिती पुन्हा एकदा समोर आणली आहे. वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या […]Read More

शिक्षण

10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला

सांगोला, दि. १७ : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर सुरक्षित ठेवणारी ‘स्ट्राँग रूम’ फोडून भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगोला विद्यामंदिर प्रशालेत उघडकीस आली आहे. गुरूवारी होणाऱ्या भूगोलाच्या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, आता बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या पेपर […]Read More

देश विदेश

पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल

मुंबई, दि. १७ : भारतीय पोस्ट खाते अत्याधुनिक आणि वेगवान सेवा देऊन ग्राहकांना कुरिअर सेवा सोडून पुन्हा पोस्टाकडे वळायला भाग पाडत आहे. टपाल विभाग आजपासून (१७ मार्च) एक नवीन जलद वितरण सेवा सुरू करत आहे. या नवीन सुविधेअंतर्गत निवडक शहरांमध्ये २४ तासांच्या आत पार्सल पोहोचवले जातील. ज्यांना महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू किंवा पार्सल तातडीने पाठवायचे आहेत […]Read More

देश विदेश

भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख

उज्जैन, दि. १७ : कॅनडामध्ये कारच्या धडकेमुळे मृत्यू झालेला उज्जैनचा विद्यार्थी गुरकीरत सिंग मनोचाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. , कॅनडा सरकार मृतदेह देण्यासाठी सुमारे 40 हजार डॉलर (सुमारे 35 लाख रुपये) जमा करण्यास सांगत आहेत असे गुरकीरतच्या कुटुंबाचे म्हणणे आहे, इतकंच नाही, तर तपास प्रक्रियेमुळे रुग्णालयातून मृतदेह 15 दिवसांनीच […]Read More

राजकीय

जलप्रवासी वाहतुकीसाठी मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात

मुंबई, दि.१७ : “मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चिती केली जावी. जलप्रवासी वाहतूकीसाठी आवश्यक बोटींची बांधणी यातून होऊ शकेल”, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मत्स्यव्यवसाय […]Read More

शिक्षण

सामूहिक कॉपी प्रकरणात शिक्षण मंडळाकडून 103 शिक्षकांवर कारवाई

मुंबई, दि. १६ : लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी मंडळाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले होते. या तंत्रज्ञानाचा वापर कमालीचा यशस्वी ठरला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल तपासणीतून सामूहिक कॉपीचे धक्कादायक प्रकार उजेडात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य माध्यमिक व उच्च […]Read More

देश विदेश

युद्धाचे बनावट व्हिडिओ शेअर केल्या प्रकरणी UAE मध्ये 19 भारतीयांवर

अबुधाबी, दि. १६ : इस्रायल–अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. या प्रकरणी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये बनावट युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी १९ भारतीयांसह एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, सर्व आरोपींना […]Read More

देश विदेश

Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार

मुंबई, दि. १६ : 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास महागणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग (FASTag) वार्षिक पासच्या किमतीत 2.5% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खाजगी वाहन मालकांना वार्षिक पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये द्यावे लागतील. या पासमुळे पास कार वापरकर्त्यांना देशभरातील 200 टोल प्लाझावर न थांबता प्रवास करता येतो. 52 लाखांहून अधिक हायवे […]Read More