mmcnews mmcnews

साहित्य

2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान

नवी दिल्ली, दि. १६ : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मराठी भाषेतून साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण 11 पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्य कृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्यात […]Read More

महानगर

डिजिटल अरेस्ट – निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 40 लाखांचा गंडा

मुंबई, दि. 14 : डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली भांडुपमध्ये एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला तब्बल ३९.६० लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत भामट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि या ज्येष्ठ नागरिकाची आयुष्यभराची कमाई हडप केली. याप्रकरणी ईस्ट सायबर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार भांडुप पश्चिम येथे […]Read More

मनोरंजन

भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने (CBFC) भारतीय चित्रपट सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण नियमावली जाहीर केली आहे. या नवीन निर्देशानुसार, आता सर्व भारतीय चित्रपटांमध्ये ‘सबटायटल्स’ (उपशीर्षके) आणि ‘ऑडिओ डिस्क्रिप्शन’ (श्राव्य वर्णन) समाविष्ट करणे कायदेशीररीत्या बंधनकारक असणार आहे. चित्रपटांची उपलब्धता आणि सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय १५ मार्च २०२६ पासून देशभरात लागू केला जाणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या […]Read More

ट्रेण्डिंग

पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार

मुंबई, दि. १४ : इंधनटंचाईमुळे राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. यामुळे हजारो कामगारांना सक्तीने घरी बसावे लागत आहे. राज्याच्या तिजोरीत महत्त्वाची भर घालणारा मद्यनिर्मिती उद्योगही येत्या १५ दिवसांत इंधन टंचाईमुळे बंद ठेवावा लागण्याची शक्यता दिसत आहे. मद्यनिर्मितीमध्ये काचेच्या बाटल्या आणि ॲल्युमिनियम कॅन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गॅसचा वापर होतो. प्रत्येक कंपन्यांचा आकार हा वेगळा […]Read More

ट्रेण्डिंग

या कार्ड धारकांसाठीच विमानतळ लाउंज सुविधा होणार बंद

मुंबई, दि. १४ : NPCI च्या नवीन निर्णयानुसार, १ एप्रिल २०२६ पासून RuPay Platinum डेबिट कार्डवरील विमानतळ आणि रेल्वे लाउंजमधील विनामूल्य प्रवेश सुविधा कायमची बंद होणार आहे. NPCI ने आपल्या सर्व सदस्य बँकांना याबाबत परिपत्रक पाठवले असून, बँकांनी त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. देशातील लाखो RuPay Platinum कार्डधारकांना या बदलाचा थेट फटका बसणार आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा

पुणे, दि. 14 : देशभरातील नागरिक गॅसचा टंचाईने त्रस्त असताना पुण्यातील शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांना एलपीजी (LPG) ला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाईल इथर अ डीएमई (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश आलं असल्याचा दावा केला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाईवामी राजा आणि त्यांच्या […]Read More

पर्यटन

भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ

मुंबई, दि. १४ : युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक विस्कळीत झाल्याने भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना ३० दिवसांच्या व्हिसा मुदतवाढीचा निर्णय भारत सरकारने घेतला असून ओव्हरस्टेवरील म्हणजेच ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहिल्यास आकारला जाणारा दंडही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लवकरच संपणारे किंवा आधीच संपलेले सर्व व्हिसा आणि ई-व्हिसा […]Read More

ट्रेण्डिंग

गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी

मुंबई, दि. १४ : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे त्रस्त होत नागरिकांनी गॅस एजन्सीज समोर रांगा लावायला सुरूवात केला आहे. देशात पुरेसा गॅस साठा असून त्याचा योग्य पुरवठा केला जाईल याची हमी शासनाकडून वारंवार दिली जात आहे. मात्र तरीही बाजारात गॅस टंचाई असल्याचे चित्रच सर्वत्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एका परिपत्रकाद्वारे […]Read More

महानगर

नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी ‘बाल मराठी संमेलन’चे

मुंबई, दि.१४ : ‘बाल मराठी संमेलन’ येत्या १६ व १७ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या संयोजनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून साकार होत असलेले हे संमेलन नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन […]Read More

शिक्षण

एन.डी.स्टुडिओतील सहलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

मुंबई दि १४ : कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत जिल्हा परिषदेच्या काकडवाल शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीत चित्रपटात पाहिलेले भव्य देखाव्यांचे सेट प्रत्यक्षात अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला. प्रसिद्ध कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी कर्जत-खालापूर येथे एन. डी. स्टुडिओ उभारला आहे. या स्टुडिओचा ताबा आता महाराष्ट्र शासनाने घेतला असून, स्टुडिओचे […]Read More