Month: March 2024

पर्यटन

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे, कारण मंदिराच्या आत हिरे आणि सोन्याचे दागिने, मूर्ती आणि नाण्यांनी भरलेल्या तिजोरी आहेत. असे मानले जाते की मंदिराचा उगम 5,000 वर्षांपूर्वीचा आहे आणि त्याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये देखील आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी महिला […]Read More

महिला

महिलांनो ‘या’ आजाराकडे दुर्लक्ष करु नका

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक वेळा व्यस्त वेळापत्रकामुळे तर कधी निष्काळजीपणामुळे स्त्रिया आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मात्र या समस्येवर वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांना त्यांचे हक्क आणि कर्तव्येच नव्हे तर त्यांच्या आरोग्याबाबतही […]Read More

महानगर

तारपा वादक भिकल्या धिंडा पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर

पालघर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मधल्या वाळवंडा इथले सुप्रसिद्ध लोककलाकार तारपा वादक भिकल्या धिंडा यांची पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभे मध्ये जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते भिकल्या धिंडा यांना जिल्हा परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून गौरविण्यात आलं.धिंडा यांची तिसरी पिढी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन […]Read More

पर्यटन

दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुरुडेश्वर मंदिरात शंकराची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती आहे. हे मंदिर कंदुका टेकडी आणि अरबी समुद्राने वेढलेले आहे. मुरुडेश्वराचे मंदिर तपशीलवार दगडी कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहे जे महान स्थापत्यकलेची प्रशंसा करणाऱ्यांसाठी हे एक आवश्यक ठिकाण बनवते. मुरुडेश्वराच्या मूर्तीची उंची १२३ फूट असून मंदिरातील मुख्य देवता श्री […]Read More

साहित्य

बाबासाहेब परीट यांची साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांची भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ११ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील कथाकथनासाठी परीट यांची एकमेव निवड झाली आहे. परीट यांच्या निवडीमुळे सांगलीच्या साहित्य क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बाबासाहेब परीट यांनी आजवर […]Read More

महानगर

अटल सेतूच्या परिसरात वसणार ‘तिसरी मुंबई’

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातून येणाऱ्या प्रचंड लोकसंख्येला सामावून घेणाऱ्या महानगरी मुंबईमध्ये प्रचंड बांधकामे झाल्यामुळे आता शहर विस्तारासाठी अधिक जागेची गरज निर्माण झाली आहे. यामुळे आता लवकरच तिसरी मुंबई उभारणीसाठीचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात अटल सेतूच्या आसपास ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. […]Read More

देश विदेश

प्रा. साईबाबा यांना उच्च न्यायालयाकडून क्लिन चिट

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रा. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची नुकतीच मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली. या निकालाला खंडपीठानं स्थगिती द्यावी, असं अपिल राज्य शासनानं केलं होतं. पण हे अपिल देखील हायकोर्टानं फेटाळून लावलं आहे. प्रा. साईबाबा यांच्यासह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, […]Read More

राजकीय

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारास खर्चाची मर्यादा ७० लाख होती ती आता ९५ लाख करण्यात आली आहे. तर अनामत रक्कम २५ हजार रुपये आहे. मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारास सूचक म्हणून […]Read More

ट्रेण्डिंग

उपराजधानीत १०० पैकी ६ तरुण मोबाईलच्या व्यसनाधिन

नागपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईलच्या अति वापरामुळे तरुणाई मोबाईल व्यसनाधिन होत आहे.उपराजधानीत मोबाईलचे व्यसन ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. शहरातील विविध मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण शंभर रुग्णांपैकी सहा रुग्णांना मोबाईलचे व्यसन असल्याचे निरीक्षण मानसोपचार सोसायटी नागपूरने नोंदवले आहे.भ्रमनध्वणीच्या व्यसनामुळे या व्यक्तीच्या स्वभावात बदल, चिडचिडपणा, झोप न येणे, नैराश्यासह इतरही काही […]Read More