Month: March 2024

देश विदेश

सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींनी केली राज्यसभेवर नियुक्ती

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (8 मार्च) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली.पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले- भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित केले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

LPG सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. या कपातीनंतर आता दिल्लीत किंमत 903 रुपयांवरून 803 रुपये, भोपाळमध्ये 808.50 रुपये, जयपूरमध्ये 806.50 रुपये, पटनामध्ये 901 रुपये तर मुंबई मध्ये ८०३ रुपये अशा किमती कमी झाल्या आहेत. […]Read More

मनोरंजन

या राज्यात लाँच झाला देशातील पहिला सरकारी OTT

तिरुवनंतपुरम्, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या सर्वांगिण विकासात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या केरळ राज्यात आता देशातील पहिला OTT प्लॅटफॉर्म सुरु झाला आहे. स्वस्त सरकारी इंटरनेटनंतर आता केरळ सरकार स्वत:चा ओटीटी (ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिस) प्लॅटफॉर्म काल लाँच केला. तीन वर्षांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या या प्लॅटफॉर्मचे नाव ‘सी-स्पेस’ C- Space आहे. तो […]Read More

ट्रेण्डिंग

केदार शिंदेंनी केली ‘आईपण भारी देवा’ चित्रपटाची घोषणा

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर केदार शिंदे यांनी आज महिला दिनाच्या निमित्तानं नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत केदार शिंदे यांनी ‘आईपण भारी देवा’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आईपण भारी देवा’ या चित्रपटाबाबतची इतर माहिती गुप्त […]Read More

मनोरंजन

स्वप्निल जोशी निर्मित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलिज

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याल महिलांच्या आयुष्याचे विविध पैलू उलगडणाऱ्या मराठी चित्रपटांचा ट्रेंड आला आहे. मराठीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्निल जोशी अशाच आशयाचा एक चित्रपट घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्निल निर्माता या भूमिकेत दिसणार आहे. आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून “नाच गं घुमा” या […]Read More

ट्रेण्डिंग

महिला दिनानिमित्त Ola Electric Scooter ची खास ऑफर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला दिनानिमित्त Ola इलेक्ट्रिकने ८ मार्च ते १० मार्च या कालावधीसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. ही ऑफर एस १ एअर, एस १ एक्स, एस १ एक्स प्लस आणि एस १ प्रोवर लागू आहे. इलेक्ट्रिक स्कूटरवर २५ हजारांपर्यंत ऑफर देण्यात आली. याशिवाय, महिलांना २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार […]Read More

महिला

सरकारकडून तिच्या साठी ‘या’ योजना

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजात महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने असला तरी, त्यांना अजूनही अनेक क्षेत्रांत योग्य ती मान्यता मिळत नाही. आजच्या काळातही महिलांना विविध प्रश्नांवर त्यांच्या हक्कांसाठी वकिली करावी लागते. समान हक्क आणि महिलांच्या सामाजिक योगदानाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. भारतातही, सरकार महिलांना […]Read More

पर्यटन

सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक, वैष्णव देवी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैष्णव देवी मंदिर हे भारतातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे शक्तीपीठांपैकी एक आहे आणि वैष्णोला समर्पित आहे जे देवी दुर्गा चे प्रकटीकरण आहे. मंदिर सुंदर डोंगरांनी वेढलेले आहे आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 20 किमीचा ट्रेक आहे. असे मानले जाते की देवी खऱ्या भक्ताच्या सर्व विनंत्या पूर्ण करते […]Read More

राजकीय

रोहित पवारांना धक्का, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त

छ .संभाजीनगर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे.कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती ती चुकीची होती असं म्हणत ई डी ने कारखाना जप्तीची कारवाई केला आहे. या जप्तीमध्ये कारखान्याची […]Read More

खान्देश

महिला दिनानिमित्त ११० महिलांचा “वुमन्स सायलॉथॉन “मध्ये सहभाग

नाशिक, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक महिला दिनानिमित्त आज नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “वुमन्स सायक्लोथॉन 2024” चे आयोजन करण्यात आले. यामध्ये 110 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सकाळी ठीक साडेसहा वाजता सर्व सायकलिस्ट महिला अनंत कानेरे मैदान येथे जमल्या. सर्वांना ती फिट तर कुटुंब फिट […]Read More