Month: March 2024

राजकीय

माथाडी कामगारांचे साखळी उपोषण सुरू

मुंबई दि.19( एम एमसी न्यूज नेटवर्क) : कापड बाजारातील माथाडी – हातगाडी गरीब कष्टकरी कामगारांना कांदिवली – चारकोप सह्याद्री नगर येथील शासनाने दिलेल्या ७ एकर मोकळया भुखंडावर कापड बाजार आणि दुकाने मंडळ (बोर्ड) यांच्या माध्यमातून प्रचलीत पध्दतीने घरे बांधून देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या २० दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानात साखळी उपोषणाला बसले आहेत. कापड बाजारात […]Read More

राजकीय

नवनीत राणा यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये

मुंबई दि.19 (एम एमसी न्यूज नेटवर्क): नवनीत रवी राणा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचे निवेदन त्यांच्या अमरावतीस्थित कार्यालयात जाऊन दिल्याचे संजय खामकर यांनी यावेळी सांगितले. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या जागेवर २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या बनावट जातीच्या प्रमाणपत्राविरोधात मुंबई उच्च न्यायालयात २०२१ मध्ये राणा यांच्या विरोधात निकाल लागला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

‘ वंचित ‘ ने काँग्रेसला दिला नवीन प्रस्ताव, म्हणाले आम्ही

अकोला, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीत महाराष्ट्रातील 7 जागांवर काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, खर्गे यांना विनंती केली आहे की महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची […]Read More

देश विदेश

राज ठाकरे एन डी ए चे नवे घटक … !

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे हा एन डी ए चा नवीन घटक पक्ष असणार आहे. त्याच दृष्टीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विविध दिल्लीत शहा यांच्या निवासस्थानी भेट झाली. महाराष्ट्रात मनसे ला किमान दोन जागा मिळतील अशी चर्चा यावेळी झाल्याचे समजते. सोबत […]Read More

विदर्भ

पोलिसांच्या चकमकीत चार नक्षल ठार

गडचिरोली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : C ६० पोलीस दल आणि नक्षल मध्ये सकाळच्या सुमारास चकमक उडाली,सुमारे एक ते दीड तास चाललेल्या चकमकीत चार पुरुष नक्षल ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश मिळाले आहे. चकमकीनंतर पोलिसांनी जंगलात चकमकी ठिकाणी शोध मोहीम शीघ्र करून अधिक तपास केला असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून […]Read More

विदर्भ

देशात संपूर्ण समान नागरी कायदा लागू व्हावा

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात 370 कलम हटविण्यात आले, अयोध्येत राम मंदिर झाले, CAA लागू करण्यात आले, काशी, मथुरा येथे मंदिर व्हावे, लोकसंख्या नियंत्रण कायदा यावा आणि देशात संपूर्ण समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 8 करोड […]Read More

देश विदेश

माकडांनी हल्ला केल्यास हा देश देणार नुकसान भरपाई

बँकॉक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णकटीबंधात असलेल्या जगातील महत्त्वाच्या पर्यंटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना मोकाट माकडांचा उपद्रव सहन करावा लागतो. पर्यटकांच्या खाण्याच्या वस्तू, मोबाईल कॅमेरे पळवणे हे माकडांचे उच्छाद नेहमीच चालू असतात. त्यातच काहीवेळा चिडखोर माकडांनी हल्ला केल्यामुळे पर्यटक जखमी झाल्याच्या घटनाही घडतात. याबाबत महत्त्वाची भूमिका घेत थायलंड सरकारने माकडांचा हल्ला झालेल्या पर्यटकांना […]Read More

Lifestyle

या राज्यात महागाई दर आहे सर्वांंत कमी

पणजी, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशविदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोवा राज्यात इंधनाचा आणि मद्याचा दर अन्य राज्यांच्या तुलनेत कमी असतो, हा विशेष नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता पर्यटन हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या गोव्यात महागाई निर्देशांक देशात सर्वात कमी असल्याची बाबही समोर आली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात गोव्यातील किरकोळ […]Read More

देश विदेश

मालदिवमधील निवडणूकीसाठी भारतासह या देशांत ठेवण्यात येणार मतपेट्या

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनच्या नादी लागून भारताविरोधी कुरबुरी करणाऱ्या मालदिवला आता निवडणूका पार पाडण्यासाठी काही अंशी का होईना पण भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे. यंदा मालदीवमध्ये संसदीय निवडणुकाही होणार असून, भारत, श्रीलंका आणि मलेशियामध्ये मतपेट्या ठेवल्या जाणार असल्याचे मालदीवच्या निवडणूक आयोगाने जाहीर केले. जवळपास ११ हजार मालदीवच्या जनतेनं त्यांची मतदान केंद्रे […]Read More

देश विदेश

गेल्या पन्नास वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण लवकरच

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूर्यग्रहण म्हणजे जगभरातील खगोलप्रेमींसाठी पर्वणीच असते. काही खगोल अभ्यासक तर सूर्यग्रहण नीट पाहता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासही करतात. वर्ष २०२४ मधले पहिले आणि गेल्या पन्नास वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण येत्या फाल्गुन अमावास्येला (८ एप्रिल ) होणार आहे. विशेष म्हणजे हे खग्रास सूर्यग्रहण आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असल्याने सूर्य […]Read More