mmcnews mmcnews

खान्देश

फायरिंगचा सराव करताना स्फोट, दोन अग्नीवीर मृत्यूमुखी

नाशिक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये देवळाली कॅम्प येथे प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निविरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी फायरिंग रेंजमध्ये ‘आयएफजी इंडियन फिल्ड गन’ने फायरिंग सुरु होती. त्यावेळी ‘शेल’चा ब्लास्ट झाल्याने त्याचा तुकडा अग्निवीर जवानांच्या शरीरात घुसला. दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजारांचे सानुग्रह अनुदान

सांगली,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक नोंदणीकृत जिवंत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत उचांकी असे […]Read More

महिला

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील ३ आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. गुन्हे शाखेने दोन संशयितांना नागपूर मधून ताब्यात घेतले तसेच बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले. सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच […]Read More

पर्यटन

प्रभू श्रीरामांची देशातली सर्वात उंच मूर्ती उभारली नाशिकमध्ये

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमधील तपोवनातील रामसृष्टी उद्यानात भगवान श्रीरामांच्या ७० फूट मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाला राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून उभी असलेला हा पुतळा भक्त आणि पर्यटक दोघांनाही तपोवनाकडे […]Read More

बिझनेस

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ११ ऑक्टोबर रोजी टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जाबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. रतन टाटांच्या निधनानंतर मुंबईत टाटा समुहाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी व विश्वस्तांच्या सहमतीने […]Read More

महानगर

बांगलादेशातील जेशोरेश्वरी देवीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केलेला चांदीचा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बांगलादेशातील सातखीरा येथील श्यामनगर येथील जेशोरेश्वरी मंदिरातून माँ कालीचा मुकुट चोरीला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2021 मध्ये मंदिराच्या भेटीदरम्यान हा मुकुट भेट दिला होता. मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी दिवसभराची पूजा आटोपून घराबाहेर पडले असताना गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. अहवालानुसार, सफाई […]Read More

पर्यटन

नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी झाली यशस्वी

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या सी 295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याला वॉटर सॅल्युटद्वारे मानवंदना देण्यात आली. नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या […]Read More

विदर्भ

दीक्षाभूमीवर आज पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण…

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर आज दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आणि समता सैनिक दल यांचा उपस्थितीत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात मुख्य स्टेज समोर पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे जवान, बौध्द अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोला पुष्पहार […]Read More

शिक्षण

अनुदानित शाळांना अधिक 20 टक्के अनुदान टप्पा मंजूर

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासन मान्य खाजगी अंशत: अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकषांची पूर्तता केलेल्या 820 प्राथमिक शाळा, 3513 वर्ग/ तुकड्या आणि त्यावरील 8602 शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यानुसार 1984 माध्यमिक शाळा, 2380 वर्ग/तुकड्या […]Read More