माथेरानमध्ये Use & Throw रेनकोटवर बंदी

 माथेरानमध्ये Use & Throw रेनकोटवर बंदी

नेरळ, दि. ११ : वर्षभर पर्यटकांची वर्दळ असलेल्या माथेरानमध्ये प्रशासनाकडून नेहमीच पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे नियम आमलात आणले जातात. गेल्या काही वर्षांपासून येथे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पर्यटन स्थळे, जंगलातील पायवाटा आणि दऱ्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रॅपर्स तसेच ‘Use & Throw’ रेनकोट मोठ्या प्रमाणावर टाकून दिले जात असल्याचे चित्र दिसून येत होते. विशेषतः पावसाळ्यात या कचऱ्यामुळे गटारे तुंबणे, पाण्याचा निचरा रोखला जाणे आणि पर्यावरणाला गंभीर हानी पोहोचण्याच्या घटना वाढत होत्या. यावर उपाय म्हणून आता Use & Throw’ प्लास्टिक रेनकोटवर बंदी घालून शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत.

माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांनी ‘Use & Throw’ प्रकारातील प्लास्टिक रेनकोटच्या विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी लागू केली आहे. नेरळ ते माथेरान मार्गावरील व्यापारी, नागरिक आणि पर्यटकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून पर्यावरण संरक्षण कायदा आणि प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियमांनुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. प्लास्टिकमुळे निसर्गाला धोका निर्माण होत असल्याने ‘Use & Throw’ रेनकोटवर बंदी घालण्यात आली आहे. स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त माथेरान हेच आमचे उद्दिष्ट आहे. -चंद्रकांत चौधरी, नगराध्यक्ष

डोंगर-दऱ्या, घनदाट जंगल आणि वाहनबंदीची भौगोलिक रचना लक्षात घेता नगरपरिषदेचा हा निर्णय पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *