भायखळा येथे मतदार यादी निरीक्षण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि ११
शिवसेना भायखळा विधानसभा यांच्या वतीने मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बी एल ओ मार्गदर्शन शिबिरास भायखळा येथील लोणावा भवन येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात बी एल ओ पदाधिकारी, महिला-पुरुष पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार मिलिंद देवरा, तसेच नगरसेविका यामिनी जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मतदार नोंदणी, पुनर्निरीक्षण प्रक्रिया आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून संघटनात्मक बांधणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
शिवसेनेचे प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक हे जनतेशी जोडलेले राहून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहेत, याची प्रचिती या शिबिरातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडू. शिवसेना ही नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास उपलब्ध राहील अशी ग्वाही शिवसेना भायखळा विधानसभा विभाग प्रमुख विजय व्यापारी यांनी दिली. या शिबिरामध्ये स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS