mmcnews mmcnews

गॅलरी

समरजीत सिंह घाटगे यांची उमेदवारी दाखल

कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने दाखल केला, त्यांचा सामना मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस च्या दोन गटातील ही लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More

राजकीय

कळमनुरी मतदार संघासाठी संतोष बांगर यांचा अर्ज दाखल

हिंगोली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कळमनूरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज कळमनूरी येथील तालुका कार्यालयात दाखल केला. यावेळी मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मागील पाच वर्षात आपण केलेली कामाची परतफेड म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा विशाल […]Read More

राजकीय

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहाता येथे शिर्डी विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आपले दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहाता यांच्याकडे दाखल केले.Read More

राजकीय

ठाण्यात शिवसेना उबाठा उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे शहर मतदासंघांत राजन विचारे , कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे आणि ओवळा माजिवडा मतदारसंघातून नरेश मणेरा यांनी आपापले उमेदवारी अर्ज आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून आज दाखल केले. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More

विदर्भ

जलसंधारणाचे प्रकल्प तुडूंब, पाण्याची चिंता मिटली

वाशिम, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात मृद तथा जलसंधारण विभागाच्या अखत्यारित ९२ जलप्रकल्प आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या ताब्यातील ७७ प्रकल्पांची यशस्वी कार्यवाही सुरू आहे. एकूण १६९ जलप्रकल्पांपैकी १४३ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा १०० टक्के भरला आहे, आणि पैनगंगा नदीवरील बॅरेजेसही तुडूंब भरलेली आहेत. सोनल आणि अडाण मध्यम प्रकल्पांनी देखील १०० टक्के पाणीसाठा ओलांडल्यामुळे […]Read More

गॅलरी

अविनाश जाधव यांनी भरला उमेदवारी अर्ज

ठाणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघासाठी मनसे चे उमेदवार म्हणून अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते. त्यांचा सामना भाजपाच्या संजय केळकर आणि शिवसेना उबाठा च्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More

राजकीय

पराग आळवणी यांचा अर्ज दाखल

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा महायुतीचे विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवार पराग आळवणी यांचा उमेदवारी अर्ज आज भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत दाखल केला. याप्रसंगी ढोल-ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ML/ML/SL24 Oct. 2024Read More

राजकीय

पालघर आणि विक्रमगड मतदारसंघासाठी मनसेकडून उमेदवार जाहीर

पालघर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बुधवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मनसे कडून पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश कोरडा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मनसे ने नालासोपारा, पालघर आणि विक्रमगड या तीन मतदारसंघात आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले […]Read More

ट्रेण्डिंग

१०-१२ वीच्या मुलांनो ही बातमी तुमच्यासाठी! बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर,

दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी महत्वाची असणारी परीक्षा म्हणजे बोर्ड परीक्षा.या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेची सुरवात त्याच तारखेला होणार आहे, पण काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळली, ५ कामगारांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरातील सद्गुरु नगर येथे पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.Read More