मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीचे उमेदवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज तिसऱ्या टर्म साठी १७७ वांद्रे पश्चिम विधानसभेतून मिरवणूक काडून खार पश्चिम (उद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी) र.वा. माध्यमिक तंत्रशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, खार येथे आपला उमेदवारी अर्ज भरला. PGB/ML/PGB25 Oct 2024Read More
पुणे,दि.२५ एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून पुण्यात नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच आज सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या […]Read More
अलिबाग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पाबरे गावाच्या नजदीक एका ओढ्यामध्ये भलीमोठी मगर आढळली असल्याचे स्थानिकांनी वनविभागाला कळविले होते.महाकाय मगर मिळाल्याची माहिती वन विभागातर्फे मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था ही घटनास्थळी एका तासाभरात पोहोचली आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. मगरीचा आकार मोठा असल्याने बचाव कार्य करण्यासाठी त्यांनी अगदी […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेले उमेदवारखालीलप्रमाणे : अणुशक्तीनगर – सना मलिक – शेखइस्लामपूर – निशिकांत पाटीलतासगाव – कवठेमहांकाळ – संजयकाका पाटीलवांद्रे पूर्व – झिशान […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणवासी आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) तसेच चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी चिपी येथे विमानतळ उभारण्यात आला. या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मध्यंतरी अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टीकेचे […]Read More
भुवनेश्वर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी फिरला असताना आता पूर्व किनारपट्टीवर वेगवान वादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आता ओडिशाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर ते ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम सुरू […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांना पक्षानं पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवारांना तिकीट देण्यात आलेलं आहे. […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या तरीही राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटात घड्याळ चिन्हावरून सुरु असलेला तिढा अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घडयाळ हे चिन्ह गोठवण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली. आता ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत आपण […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी कसून तयारी केली असली तरीही गेल्या काही दिवसांत जागा वाटपावरून सुरु असलेल्या बंडखोरीमुळे भाजपही त्रस्त झाला आहे. याबाबतीत ठोस भूमिका घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]Read More