नवी दिल्ली, दि. १ : केंद्रीय मंत्रिमंडळाने एम्प्लाईमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं, रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जात आहे. सरकारचं या योजनेअंतर्गत 2 वर्षात 3.5 कोटींहून अधिक लोकांना नोकरी देण्याचं लक्ष्य आहे. त्याचबरोबर सरकार पहिल्यांदाच काम करणाऱ्या कामगारांना दोन हफ्त्यांमध्ये एक महिन्याच्या […]Read More
मुंबई, दि १मुंबई विभागीय काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी आज अवनीश सिंग यांची नियुक्ती करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी अवनीश सिंग यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी […]Read More
मुंबई, दि. १– नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. विधानभवनातील समिती सभागृहात झालेल्या या […]Read More
मुंबई दि १:– भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. भिवंडी […]Read More
मुंबई, दि.१:– राज्यशासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (MPSC) राजीव निवतरकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन तीन नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राजीव निवतकर आणि महेंद्र वारभुवन यांनी आज सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली . आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार […]Read More
लातूर दि १:– शक्तिपीठ महामार्गच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. लातूर तालुक्यातील येळी ढोकी येथे आज मोजणीसाठी आलेल्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध करीत शेतकऱ्यांनी मोजणीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांचा मोजणीला […]Read More
मुंबई दि १ — नागपूर मध्ये उघडकीस आलेल्या शालार्थ प्रणालीप्रकरणी उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या धर्तीवर राज्यभरात अशा आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी आणि पोलिस अधिकारी यांचं विशेष तपास पथक नेमून येत्या तीन ते चार महिन्यांत त्याचा अहवाल घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. याबाबतची लक्षवेधी सूचना […]Read More
मुंबई, दि. १- पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ […]Read More
मुंबई दि १ — अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे, अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. याबाबतचा मूळ प्रश्न भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उपप्रश्न विचारले. अधिकचे व्याजदर कोणीही देत नाही, […]Read More
मुंबई दि १– भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आणि कृषिमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत अध्यक्षांकडे धाव घेत राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले यांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं. यावर निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला आणि कामकाजावर बहिष्कार घातला. पटोले यांनी स्थगन प्रस्तावाच्या […]Read More