mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी घेतली जुन्नरमधील शेतकऱ्याच्या कामाची दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२३व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात जुन्नरमधील शेतकरी रमेश खरमाळे यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा आठवड्याच्या अखेरीस लोक आराम करणे पसंत करतात, तेव्हा रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंब कुदळ-फावडे घेऊन डोंगरांवर जातात. ते जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर […]Read More

साहित्य

लेखसंग्रह प्रकाशन सोहळा जल्लोषात

मुंबई, दि 30संजीवन कला विकास प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ साहित्यीका पूर्णिमा शिंदे लिखित स्पंदन लेखसंग्रह प्रकाशन सोहळा व पुरस्कार सोहळा नुकताच सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघात संपन्न झाला. स्पंदन मधील संवेदनशील स्त्रीमन वैचारिक मूल्य व सामाजिक घडामोडी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उलगडून सांगितल्या आणि सर्वांना वाचन संस्कृती टिकविण्याचा संदेश दिला . आमदार […]Read More

क्रीडा

पनवेल मनपाची डॅशिंग नारी, अमेरिकेत ठरली सर्वात भारी…

पनवेल दि. ३०:- पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील डॅशिंग महिला कर्मचारीशुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. उत्तुंग अशा या यशाबद्दल मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचे विशेष अभिनंदन केले. अल्बामा,अमेरिका येथे शुभांगी संतोष घुले हिने भारत देशाच्या […]Read More

पर्यटन

आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५% सूट

मुंबई दि ३० — एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा […]Read More

विदर्भ

ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रातील पर्यटन १ जुलैपासून बंद….

चंद्रपूर दि ३० :—ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर (गाभा) क्षेत्रातील पर्यटन आता १ जुलैपासून पावसाळ्यामुळे बंद होणार आहे. या कालावधीत जंगल सफारीवर निर्बंध असून, पर्यटकांना व्याघ्रदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सफारी सुरू राहणार आहे. पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची संधी बफर क्षेत्रात मिळेल. कोअर क्षेत्रातील सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होईल, तोपर्यंत बफर क्षेत्रातील सफारीचा आनंद […]Read More

गॅलरी

स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे प्रतिनिधी- पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनांमध्ये ठवसणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे […]Read More

राजकीय

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या …

मुंबई, दि. ३० :- विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास […]Read More

गॅलरी

शिवसेनेच्या वरळी येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २९शिवसेना वरळी विधानसभा आणि माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या मार्गदर्शना खाली वरळी सनविले हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी य रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबिरांमधून तब्बल 900 पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिरात विभागातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन […]Read More

महानगर

उद्धव ठाकरे यांच्या वर आरोप करत सरकारकडून हिंदी सक्ती निर्णय

मुंबई दि २९– उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला, आता ते घुमजाव करीत असले तरी सध्या राज्य शासनाने या सूत्राच्या अंमलबजावणी साठी एक समिती नेमली असून सध्या त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे, नवीन समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर पुढील निर्णय करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली […]Read More

गॅलरी

वाचनसंस्कृती जनजागृतीसाठी सायकलचा वापर

मुंबई, दि २९मोबाईलच्या अतिवापर मुळे लहान मुलांवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत त्यामुळे मुले एकलकोंडी बनत असून कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. आजी आजोबा व नातवंडामध्ये गोष्टीतून होणारा संवाद व कौटुंबिक वाचन हरवत चालले आहे. घरा घरात होणाऱ्या कौटुंबिक वाचन ची जागा दुर्दैवाने मोबाईल व टीव्ही ने घेतली आहे. यासाठीच कौटुंबिक वाचन व वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रसार […]Read More