भारतातून या देशात निर्यात पूर्णपणे शुल्क मुक्त

 भारतातून या देशात निर्यात पूर्णपणे शुल्क मुक्त

नवी दिल्ली, दि. २७ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज मुक्त व्यापार करार (FTA) स्वाक्षरित झाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत हा करार झाला.आता भारतातून न्यूझीलंडला पाठवल्या जाणाऱ्या लेदर उत्पादने, वस्त्रोद्योग, प्लास्टिक आणि अभियांत्रिकी वस्तूंसारख्या वस्तूंवर कोणतेही निर्यात शुल्क लागणार नाही. यामुळे या श्रम-प्रधान क्षेत्रांना म्हणजेच लेबर इंटेंसिव्ह सेक्टर्सना थेट फायदा होईल.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी याला ‘एका पिढीत एकदा होणारा’ करार म्हटले आहे. तर पीयूष गोयल यांनी याला भारत-न्यूझीलंड आर्थिक संबंधांमध्ये ‘नवीन अध्यायाची सुरुवात’ म्हटले आहे. पीयूष गोयल म्हणाले की, हा FTA ‘विश्वास, सामायिक मूल्ये आणि शाश्वत आर्थिक विकासाच्या सामायिक दृष्टिकोना’चे प्रतीक आहे. हा करार भारतासाठी ओशनिया आणि प्रशांत द्वीपसमूहातील बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याचे प्रवेशद्वार देखील बनेल.

कराराचे फायदे

सेवा क्षेत्रात भारताने आयटी, शिक्षण, आर्थिक सेवा, बांधकाम आणि पर्यटन यांसारख्या उच्च-मूल्याच्या क्षेत्रांमध्ये बाजारपेठेत प्रवेश मिळवला आहे. करारानुसार, आयुष, योग प्रशिक्षक, भारतीय शेफ आणि संगीत शिक्षकांसाठीही मार्ग खुले होतील.

एफटीएमध्ये नवीन तात्पुरत्या रोजगार प्रवेश व्हिसाचा मार्ग तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत, दरवर्षी 5,000 भारतीय कुशल व्यावसायिक न्यूझीलंडमध्ये 3 वर्षांपर्यंत काम करू शकतील.

अभियांत्रिकी, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात विशेषतः संधी असतील. याव्यतिरिक्त, भारतीय वाईन आणि स्पिरिट्सनाही न्यूझीलंडच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळेल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *