पोस्टमनच्या पगारात होणार मोठी वाढ
मुंबई, दि. 27 : टपाल कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटना असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल ऑर्गनायझेशन्सने आठव्या वेतन आयोगासमोर अनेक प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. 20 एप्रिल 2026 रोजी सादर केलेल्या या निवेदनात वेतनवाढ, भत्त्यांमध्ये सुधारणा, पदोन्नती आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुविधांची मागणी करण्यात आली आहे. संस्थेने वार्षिक वेतनवाढ 3% वरून 6% पर्यंत वाढवण्याची मागणी देखील केली आहे. एफएनपीओचे म्हणणे आहे की, महागाई, विशेषतः शहरी खर्च आणि वाढता आरोग्यसेवा व शिक्षण खर्च पाहता सध्याची 3% वाढ अपुरी आहे.
FNPO ने प्रवेश-स्तरावरील (स्तर 1) कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सातव्या वेतन आयोगाअंतर्गत असलेल्या 18,000 रुपयांवरून 69,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. पोस्टमन आणि मेल गार्ड्स (स्तर 5) यांचे मूळ वेतन 25,500 रुपयांवरून 1.12 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. टपाल आणि वर्गीकरण सहाय्यक, पर्यवेक्षक आणि इतर संवर्गांसाठीही भरीव वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वेतन रचना सुलभ करण्यासाठी संस्थेने काही वेतन स्तर विलीन करण्याची शिफारस देखील केली आहे. टपाल कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्यास, लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो
SL/ML/SL