यशदा, पुणे येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा शुभारंभ

 यशदा, पुणे येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा शुभारंभ

पुणे दि २७ : आज यशदा, पुणे यांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांसाठी आयोजित क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या प्रशिक्षणाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्य करताना आवश्यक असणारे प्रशासनिक ज्ञान, निर्णयक्षमता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. विविध तज्ञ मार्गदर्शकांनी प्रभावी शासनव्यवस्था, निधी नियोजन, विकासकामांची अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम व उत्तरदायी नेतृत्व विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यक्षमता वाढून ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अध्यक्ष वीरधवल जगदाळे, सुहास दिवसे, शेखर गायकवाड, श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाचे संचालक गिरीश भालेराव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *