mmcnews mmcnews

विज्ञान

पुण्यातील शास्त्रज्ञानी लावला विश्वातील सर्वात दूरच्या दीर्घिकेचा शोध

पुणे, दि. 5 : टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (NCRA) संशोधक राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) च्या डेटाचे विश्लेषण करताना विश्वातील सर्वात दूरच्या आणि प्रारंभिक काळात अस्तित्वात असलेल्या अलकनंदा नावाच्या सर्पिल दीर्घिकेचा शोध लावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही दीर्घिका विश्व केवळ 1.5 अब्ज […]Read More

देश विदेश

राज्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणासाठी जर्मनीचे दरवाजे खुले

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी आज महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे […]Read More

अर्थ

RBI कडून रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी GDP मध्ये 8.2%

नवी दिल्ली,दि. ५ : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली असून, देशाच्या GDP मध्ये 8.2% वाढ नोंदवली गेली आहे. ही महत्त्वाची आर्थिक घडामोड देशाच्या वित्तीय धोरणात नवा टप्पा ठरली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक […]Read More

अर्थ

पान मसाला-सिगारेटवर नवीन कर- संसदेत विधेयक मंजूर

नवी दिल्ली, दि. 5 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत आरोग्य सुरक्षेतून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यावर सिगारेट , पान मसाला सारख्या उत्पादनांवर सरकार अतिरिक्त कर लावेल. सरकारच्या तिजोरीत जमा होणारा अतिरिक्त पैसा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती […]Read More

महानगर

छत्रपती शिवाजी महाराज मैदान (दादर) येथे ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे

मुंबई, दि ५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून चैत्यभूमी (दादर) येथे येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सोयी-सुविधांमध्ये दरवर्षी सातत्याने आमुलाग्र सुधारणा आणि वृद्धी होत आहे. तसेच, जनसंपर्क विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती अनुयायांना माहिती पुस्तिकेतून उपलब्ध करून दिली जाते. […]Read More

राजकीय

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनआरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना

दिल्ली, दि ५: आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम […]Read More

ट्रेण्डिंग

DRDO मध्ये 700 हून अधिक जागांसाठी भरती, पगार लाखाच्या घरात

मुंबई, दि. ४ : डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गेनायजेशन (DRDO) ने CEPTAM 11 भरतीसाठी एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर रोजी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर सुरू होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या भरती मोहिमेद्वारे सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी (Senior Technical Assistant B) आणि तंत्रज्ञ ए […]Read More

ट्रेण्डिंग

एप्रिल 2026 पासून लागू होईल नवी कामगार संहिता

नवी दिल्ली, दि. ४ : कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी काल जाहीर केले की, चार नवीन कामगार संहितांचे मसुदा नियम लवकरच पूर्व-प्रकाशित केले जातील. त्यानंतर 5 दिवसांपर्यंत कोणीही सूचना देऊ शकेल आणि नंतर अंतिम अधिसूचना येईल. मनसुख मांडविया यांचे म्हणणे आहे की, पुढील आर्थिक वर्षापासून (एप्रिल 2026) या संहिता पूर्णपणे लागू होतील. चारही […]Read More

ट्रेण्डिंग

Indigo ची २५० हून अधिक उड्डाणे रद्द

मुंबई, दि. ४ : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी Indigoला सलग तिसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. याचा Indigoच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. वृत्तसंस्था PTI नुसार, आज दिल्ली आणि मुंबईसह १० हून अधिक विमानतळांवर इंडिगोची ३०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. पुणे विमानतळावरील एका प्रवाशाने आठ तासांहून अधिक वेळ वाट पाहिल्याची […]Read More

अर्थ

विलंब शुल्कासह 31 डिसेंबरपर्यंत भरता येणार ITR

मुंबई, दि. 4 : 2024-25 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) तुम्ही अजुनही भरले नसतील, तर तुम्ही 31 डिसेंबर 2026 पर्यंत विलंब शुल्कासह ते भरू शकता. यानंतर तुम्ही रिटर्न भरू शकणार नाही, ज्यामुळे नोटीस येण्यासोबतच दंड आणि इतर कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे बिलेटेड इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल, […]Read More