या दिवशी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार

 या दिवशी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार

मुंबई, दि. २० : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) 7 मे 2026 रोजी धावपट्टीच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या नियोजित कामामुळे 7 मे रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 17:00 या सहा तासांच्या कालावधीत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. या वेळेत विमानांची उड्डाणे आणि लँडिंग पूर्णपणे थांबवण्यात येईल. पावसाळ्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही ‘मान्सून रेडीनेस’ मोहीम राबवली जात आहे. विमानतळ प्रशासनाने या देखभालीच्या कामाचे नियोजन सहा महिने आधीच सुरू केले होते. सर्व विमान कंपन्या आणि संबंधितांना याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमान फेऱ्यांच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करता येतील. 1033 एकर परिसरात पसरलेल्या या विमानतळाच्या पायाभूत सुविधांची तपासणी तज्ज्ञांमार्फत केली जाणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *